Tarun Bharat

काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे

महत्वाची जबाबदारी; सोलापुरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबतच प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. या निवडीनंतर सोलापुरात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

काँग्रेस पक्षाने शुक्रवारी दुपारी नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नव्या पदाधिकार्‍यांची नावे जाहीर केली. पटोले यांच्यासोबत कार्याध्यक्षपदी सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, शिवाजी मेघे, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, कुणाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नव्या पदाधिकार्‍यांमध्ये आमदार प्रणिती शिंदे एकमेव महिला आहेत.

आमदार प्रणिती शिंदे या 2009 पासून आमदार म्हणून कार्यरत आहेत. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मिडीया पॅनलच्या त्या सदस्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळ अनुसुचित जाती समिती अध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. प्रदेश काँग्रेसवर त्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

Related Stories

लस घेतलेले शिक्षक घरातच

Patil_p

महाबळेश्वर तापोळा रस्तावर अपघात – 3 शिक्षक गंभीर जखमी

Patil_p

राष्ट्रीय ज्युनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेत खटावचा ‘ध्रुव तारा’ चमकला

Patil_p

आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर

Patil_p

संक्रांतीनिमित्त विठोबाच्या मंदिरात पाना फुलांची आकर्षक सजावट

Abhijeet Shinde

“घोषणाबहाद्दर” मंत्री वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा : आमदार पडळकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!