Tarun Bharat

काँग्रेस महिला मोर्चाचा मुख्यमंत्री निवासावर मोर्चा

Advertisements

लता गावकरची बदली रद्द करण्याची मागणी

प्रतिनिधी / पणजी

अंगणवाडी कर्मचारी लता गावकर हिची बदली रद्द करावी, अशी मागणी करीत गोवा प्रदेश काँग्रेस महिला मोर्चाच्या सदस्यांनी काल सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या आल्तीन येथील शासकीय निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना वाटेत अडवून त्यांची रवानगी पर्वरी पोलीस स्थानकात केली. काँग्रेस महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो तसेच इतर 12 महिला कार्यकर्त्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजी करीत भाजप सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध व्यक्त केला. बंगल्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात महिला पोलीस तैनात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची डाळ शिजली नाही. पोलिसांचा पहारा तोडून मुख्यमंत्र्याच्या बंगल्यापर्यंत जाण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न  केला, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

Related Stories

गोवा डेअरी निवडणूक निवाडा आज होणार

Amit Kulkarni

मेणकुरे जलशुद्धिकरण प्रकल्पाचे सर्व सोपस्कार पूर्ण

Omkar B

सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलला आग

Patil_p

”निवडणुकीसाठी टॅक्सी पुरविणाऱ्या महाराष्ट्राच्या कंपनीचे कंत्राट रद्द करा”

Abhijeet Khandekar

डॅन, किओना, आवेलीनो, पर्ल, आदर्शची दुसऱया दिवशीही आघाडी

Amit Kulkarni

पार्सेकरांचा तृणमुलला ‘नो चान्स’

Amit Kulkarni
error: Content is protected !!