Tarun Bharat

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीकडून प्रा.आसगावकर यांचा अर्ज दाखल

 प्रतिनिधी  / कोल्हापूर

कुडित्रे ( ता.करवीर ) येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीकडून पुणे शिक्षक मतदार संघातून विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज पुणे विधानभवन येथील निवडणूक निर्णय अधिकारी आणि महसूल आयुक्त सौरभ राव यांच्याकडे दाखल केला.

 काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी मंगळवारी रात्री उशिरा प्रा.आसगावकर यांची काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली होती. पुणे शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रा. आसगावकर हे गेली ३१ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असून गेली १३ वर्षे ते शिक्षण संस्था चालक संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणक्षेत्रातील शिक्षक ते संस्थाचालक अशा सर्व संघटनांवर ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय मोरे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार वंदना चव्हाण , काँग्रेसचे पदाधिकारी मोहन जोशी, पुण्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार चेतन पाटील, पुण्याचे अंकुश काकडे , तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे अनेक नगरसेवक, मतदार, शिक्षक बंधू भगिनी  उपस्थित होते. दरम्यान अरुण लाड यानी पुणे पदवीधर मतदार संघातून महाआघाडीच्यावतीने अर्ज दाखल केला.

पुणे शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने प्रा. जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष संजय मोरे,गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार वंदना चव्हाण आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर येथे रेल्वे प्रवाशी डब्याला लागली आग

Abhijeet Khandekar

अकरावीचा कटऑफ २.५० टक्क्यांनी वाढला

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू, 470 नवे रुग्ण

Archana Banage

शाहूवाडीत शुकशुकाट ; पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण

Archana Banage

खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले-दीपक केसरकर

Abhijeet Khandekar

Kolhapur : 3 हजाराची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar