Tarun Bharat

काँग्रेस संसदीय दलाची आज महत्त्वाची बैठक

Advertisements

नवी दिल्ली

 काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, 5 एप्रिल रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यातील रणनितीवर चर्चा करण्यासाठी ही काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना सकाळी साडेनऊ वाजता बैठकीसाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया सत्राचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरु झाला आहे. या शेवटच्या आठवडय़ात कोणत्या मुद्यावर चर्चा करायची, कोणत्या मुद्यावरुन सरकारला घेरायचे यासंदर्भात विरोधक रणनिती आखणार आहेत. तसेच पक्षीय पातळीवरील काही मुद्दय़ांवरही चर्चा हाणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

मुख्यमंत्री विजयन यांच्या विरोधात निदर्शने

Amit Kulkarni

डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा

Patil_p

भारतात कोरोना लसीकरणासाठी 82 लाख केंद्रे

datta jadhav

अडकलेल्या कामगार-मजुरांना ‘न्याय’

Patil_p

144 मतदारसंघांमध्ये भाजपचे विशेष ‘प्लॅनिंग’

Patil_p

कंगना राणावतची पुन्हा ‘उडवाउडवी’

Patil_p
error: Content is protected !!