Tarun Bharat

काँग्रेस संस्कृतीची घुसखोरी भाजपसाठी धोक्याची घंटा

कोअर समितीमधील गुपित बाहेर आल्याने पक्षांतर्गत सूर ‘त्या’ नेत्याचा शोध सुरु

प्रतिनिधी /पणजी

भाजपच्या कोअर समितीमधील महत्त्वाच्या विषयांवरील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतील गुपित उघड करणारा नेमका नेता कोण? या प्रश्नावरुन भाजपमध्ये गंभीर चर्चा झालेली असून काँग्रेसची संस्कृती भाजपमध्ये असणाऱया नेत्यामुळे भाजपची धोक्याची घंटा वाजलेली आहे, असा सूर आता पक्षांतर्गत उमटत आहे.

भाजपच्या गाभा (कोअर) समितीच्या बैठकीचा विस्तार करुन घेण्यात आला त्याची माहिती कोणालाच कशी नाही? खुद्द मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेण्यात आलेले नव्हते. परिणामी भाजप कोअर समितीच्या बैठकीत ते देखील अमित शहांबरोबरच्या बैठकीत झालेली चर्चा तशी गुप्त असताना ती दोन वृत्तपत्रांमध्ये पोहोचविणारा नेता एकच होता अशी माहिती हाती लागलेली आहे. गाभा समितीमध्ये केवळ भाजपचे सुरुवातीपासून व अत्यंत विश्वासू अधिकाऱयांनाच घेतले जाते. ही समिती सरकारचे धोरण ठरवित असते. सरकारच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय वा त्याबाबतची माहिती कधीच बाहेर येत नाही.

कोअर समितीची नव्याने पुनर्रचना? परंतु, प्रथमच अशा तऱहेची माहिती बाहेर आली त्याची गंभीर दखल आता पक्षाने घेतल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील तक्रार अमित शहापर्यंत देखील पोहोचलेली आहे. भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार असे वागणे केवळ काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेली मंडळीच करु शकतात आणि भाजपसाठी ही धोक्याची घंटा वाजलेली आहे. अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीवेळी कोअर समितीच्या बैठकीत जो काही वाद झाला त्याचे रेकॉर्डिंग करुन माध्यमांपर्यंत पोहोचविले की काय? याचाही शोध आता सुरु झाला आहे. भाजपने एकंदरितच हे प्रकरण आता गांभीर्याने घेतलेले आहे व आता कोअर समितीची नव्याने पुनर्रचना करण्यात येण्याची शक्यता वाढली आहे.

Related Stories

दिल्ली एफसीचा 5-1 गोलानी पराभव करून एफसी गोवा उपान्त्य फेरीत

Amit Kulkarni

पिसुर्ले इतिहासकालीन महादेव मंदीराचा रस्ता खाणमालकाने अडविला

Omkar B

दोडामार्ग चेकनाक्मयावरील सर्व अडथळे हटविले.

Patil_p

मडगावात चिकुनगुनिया रुग्णांत वाढ

Amit Kulkarni

फोंडय़ात 14 पासून सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह

Amit Kulkarni

शंकर रामाणींवरील पुस्तकांचे उद्या पणजी येथे प्रकाशन

Amit Kulkarni