Tarun Bharat

काँग्रेस स्वतःच्या सदस्यांची तरी युती घडवू शकेल ?

अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा सवाल : काँग्रेसबरोबर युतीची चर्चा स्थगित

प्रतिनिधी /मडगाव

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी आतासाठी काँग्रेसबरोबर युतीची चर्चा स्थगित केली आहे. काँग्रेस इतर पक्षांसोबत युती करणे विसरून जा, शेवटी काँग्रेस स्वतःच्या सदस्यांची युती तरी घडवू शकेल काय, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.

 समविचारी राजकीय शक्ती एकत्र येऊन ‘भाजपच्या रावणराज्या’ला पराभूत करण्याचा पर्याय देतील, असे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेसला बाजूला ठेवून अन्य पक्षांची युती राज्यात होऊ शकते आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे संकेत सरदेसाई यांच्या या वक्तव्यातून मिळत आहेत.

फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी वरि÷ निरीक्षक असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सरदेसाई म्हणाले की, गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत युतीची चर्चा थांबवली आहे. चिदंबरम यांनी म्हटले होते की, काँग्रेस सध्या युतीवर चर्चा करणार नाही. मला लोकांना सांगायचे आहे की, आम्ही काँग्रेससोबतची चर्चा स्थगित केली आहे, असे त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाने यापूर्वी काँग्रेसला चतुर्थीपूर्वी युतीबाबत चित्र स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यामुळे उत्सवासाठी घरांत एकत्र आलेल्या लोकांना योग्य संदेश पाठवता आला असता, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.

काँग्रेस स्वतःच्या सदस्यांची तरी युती घडवू शकेल ?

काँग्रेस आता आपल्या सर्व मतदारसंघांतील गटांची पुनर्रचना करत आहे. फातोर्डातही केली आहे. त्याखेरीज एकाच मतदारसंघात त्यांनी तिकिटासाठी इच्छुक असलेल्या 3 ते 4 जणांना प्रवेश दिला आहे. या प्रकारामुळे इतर पक्षांसोबत युती करणे विसरून जा, शेवटी काँग्रेस स्वतःच्या सदस्यांची युती तरी घडवू शकेल काय, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला.

दसऱयापूर्वी पर्याय देण्याचे संकेत

सरदेसाई यांनी गोव्याच्या लोकांना आवाहन केले आहे की, सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे निराश होऊ नका, कारण पर्याय येणार आहे. दसऱयापूर्वी ‘रावणराज्य’ संपविण्यासाठी पर्याय मिळणार, असे संकेत त्यांनी दिले. काँग्रेसला बाजूला ठेवून समविचारी पक्षांची आघाडी स्थापन करणार काय, असा सवाल पत्रकारांनी केला असता, थांबा आणि पाहा, आताच आपण यासंदर्भात जास्त भाष्य करणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. गोव्याच्या लोकांना वाटते की, भाजपला पराभूत करण्यासाठी युती झाली पाहिजे. आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्याची आशा आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांना भेटायला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

सासष्टीत 68.33 टक्के मतदान

Amit Kulkarni

सांगोल्डा माजी सरपंच अविनाश नाईक यांचा आज वाढदिवस

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात मुसळधार पाऊस

Amit Kulkarni

संजीवनच्या गृह परिचारिकांकडून कोरोना काळात रुग्णांना सेवा

Amit Kulkarni

जुलैमध्ये मोपावर ‘लँडिंग-टेक ऑफ’ची ट्रायल!

Amit Kulkarni

भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे

Patil_p