Tarun Bharat

काँग्रेस २०२३ च्या निवडणुकीपूर्वी उमेदवारांची घोषणा करणार

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकांवर डोळे लावून, काँग्रेस किमान एक वर्षापूर्वीच आपले उमेदवार जाहीर करण्याची योजना आखत आहे, मुख्यत: ज्या मतदारसंघांमध्ये २०१८ च्या मागील निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले होते, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कार्यकारी अध्यक्ष सलीम अहमद म्हणाले, “उमेदवारांची आगाऊ घोषणा केल्याने काँग्रेस पक्ष आणि उमेदवारांना मतदारसंघ आणि तेथील लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि निवडणुकीसाठी काम करण्यास पुरेसा वेळ मिळेल.”

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मतदारसंघात इच्छुकांनी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले, “आम्ही राज्यातील पुढील निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करण्याच्या विषयावर विविध पक्षांच्या व्यासपीठांवर चर्चा करत आहोत. हे आम्हाला पक्षातील विविध अंतर्गत समस्या आणि विविध नेत्यांमधील मतभेद दूर करण्यास मदत करेल. ”

दरम्यान, २०२३ च्या निवडणुकीला जरी वेळ असलात तरी डोळ्यासमोर ठेऊन कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणण्यासाठी काँग्रेस आतापासूनच कंबर कसून कमला लागली आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये आज २० कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

datta jadhav

कर्नाटकला कोविशील्ड लसीचे २ लाख डोस मिळालेः आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप मंत्री-काँग्रेस खासदार भिडले

Sumit Tambekar

महाराष्ट्र : 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर

Rohan_P

कर्नाटक: धारवाड अपघातातील मृतांची संख्या १२ वर : पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!