Tarun Bharat

काँग्रेस 20 नोव्हेंबर ‘किसान विजय दिवस’ म्हणून पाळणार

दिल्ली / प्रतिनिधी

काँग्रेस शनिवार दि. 20 नोव्हेंबर हा ‘किसान विजय दिवस’ म्हणून पाळणार आहे, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेणे हा ‘किसान विजय दिवसाचा मुख्य उपक्रम असेल. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर दबाव निर्माण केला जात असल्याचे सांगून लवकरच कायदे मागे घेतले जातील अशी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटकडे काँग्रेस पक्षाने लक्ष वेधले.

नरेंद्र मोदी सरकारच्या वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने तात्काळ योजना आखली आहे. किसन विजय दिवस’ तीन “कठोर” शेतीविषयक कायदे रद्द करणे हा “शेतकऱ्यांचा विजय” आहे आणि त्यांच्या निषेध आणि बलिदानाचा “परिणाम” आहे असे कॉंग्रेसने आपल्या राज्य घटकांना सांगितले आहे. “देशातील ‘अन्नदात्त्यांनी ‘सत्याग्रहा’द्वारे अहंकाराला डोके टेकवले आहे. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! ‘जय हिंद, जय हिंद का किसान’,” राहुल यांनी ट्विट केले.

राज्य घटकांना लिहिलेल्या पत्रात, काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या “सातत्यपूर्ण आणि उत्साही लढ्याला” ओळखण्यासाठी पक्ष 20 नोव्हेंबर हा ‘किसान विजय दिवस’ म्हणून साजरा करेल. पक्षाच्या युनिट्सना शेतकऱ्यांच्या वतीने देशभरात विजयी रॅली आयोजित करण्यास सांगितले गेले आहे तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या 700 हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यास सांगितले आहे आणि राज्य, जिल्हा आणि ब्लॉकमध्ये दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मेणबत्ती मार्च आणि रॅली आयोजित होईल. वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “वाईट प्रवृत्ती वरील हा सामूहिक विजय आपल्या देशातील सर्व अन्नदात्यांना नम्रपणे समर्पित आहे. “शेतकऱ्यांचा हा ऐतिहासिक विजय म्हणून साजरा करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करू या. शेतकरी लढ्याचा विजय आपल्या भागातील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन अधोरेखित करुया.

Related Stories

अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारताच्या दौऱयावर

Patil_p

जीव्हीएम कॉलेज पुरविणार पाच हजार फेसमास्क

Patil_p

पंतप्रधान योजनेतील रकमांचे कालकुंद्री पोस्टामार्फत वितरण

Archana Banage

सलगरे येथे गव्याचे दर्शन, ग्रामस्थ भयभीत

Abhijeet Khandekar

रत्नागिरी जिल्हय़ात आणखी आठ दिवस कडक लॉकडाऊन

Patil_p

उपाययोजनेच्या नियोजनात राज्यसरकार कमी पडले

Patil_p
error: Content is protected !!