Tarun Bharat

कांदा, बटाटा आवक किंचीत वाढली

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

शनिवारी एपीएमसी बाजारपेठेमध्ये कांदा व बटाटय़ाची आवक बऱयापैकी झाली. मात्र दर स्थीरच असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक मध्यम बटाटा 1700 ते 1800, मोठा 2100 ते 2300, इंदूर 1900 ते 2000, आग्रा 1900 ते 2000 प्रतिक्विंटल दर झाला होता. लसून, हैब्रेड, 4 ते 5 हजार, मध्यम 6 हजार ते 7 हजार, मोठी 8 ते 9 हजार, गूळ 3 हजार 800 ते 4 हजार, रताळी 600 ते 800 प्रतिक्विंटल, कांदा 500 रुपयांपासून 1100 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल झाल्याचे सांगण्यात आले.

शनिवारी 13 हजार 613 पोती कांदा, 5 हजार 139 पोती बटाटा, 30 रवे गूळ, तर 33 पोती रताळी अशी आवक झाल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊननंतर आता काही प्रमाणात आवक वाढत चालली आहे. वाहतूक सुरळीत झाल्यास अजूनही आवक वाढण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. याचबरोबर खरेदी, विक्रीही काही प्रमाणात वाढल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले..

Related Stories

खानापूर स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव

Amit Kulkarni

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Archana Banage

भारतीय बौद्ध महासभेतर्फे गौतम बुद्ध जयंती साजरी

Patil_p

एअर मार्शल आर. डी. माथूर यांची सांबऱयाला भेट

Patil_p

मुंबई-पुण्यातून येताना रेल्वे प्रवाशांचे हाल

Amit Kulkarni

पावसामुळे हिरवी मिरची झाली लाल, बळीराजा बनला कंगाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!