Tarun Bharat

कांदिवली : एकाच सोसायटीत 17 जणांना कोरोनाची लागण; सोसायटी सील

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई महापालिकेच्या प्रयत्नानंतरही शहारातून कोरोनाचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. येथील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री या सोसायटीत 17 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सोसायटी सील करण्यात आली आहे. तसेच कांदिवलीतील इमारतींमध्ये कोरोनाबरोबरच पाच डेल्टा प्लस रुग्णही आढळले आहेत. यामुळे महापालिका सर्तक झाली असून कांदिवलीतील नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 पैकी 10 रुग्ण बरे झाले आहेत आणि सात अजूनही उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन रुग्णालयात आहेत. कांदिवलीतील रहिवाशांसाठी आणखी एक चिंता म्हणजे महापालिकेला पाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार पूर्व भागात आणि एक पश्चिम भागात आहे. आर दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या की, शहरात हळूहळू प्रकरणे वाढत आहेत आणि तज्ञांच्या मते आम्ही पुढील महिन्यात तिसऱया लाटेची अपेक्षा येऊ शकते. लोकांनी कोरोनाला हलक्मयात घेऊ नये. सण असेल तर एकत्र जमा होणे टाळायला हवे. आम्ही आता कॉन्टॅक्ट टेसिंगवर अधिक काम करत आहोत. आम्हांला 17 कोविड रुग्ण आढळल्यानंतर महावीर नगर येथील सोसायटीला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या सोसायटीत 125 सदस्य असून नियमित कोरोनाचे नियम पाळले जात आहेत. पण असे असतानाही 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याने इतर सदस्यही धास्तावले आहेत. तर गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याचे सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले आहे. दरम्यान, याची गंभीर दखल घेत महापालिकेकडून, झोपडपट्टी परिसराबरोबरच अरुंद गल्ल्या, सार्वजनिक शौचालये, चाळी येथे पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Related Stories

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे स्वीय सचिव राम खांडेकर यांचे निधन

Tousif Mujawar

शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला

Archana Banage

शिवथर येथील दरोडय़ाचा गुन्हा उघड

Patil_p

… अन्यथा कडक लॉकडाऊन लागेल : अजित पवारांचा इशारा

Tousif Mujawar

महाराष्ट्र : थकित वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आज आक्रोश आंदोलन

Tousif Mujawar

अर्थव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी

Patil_p