Tarun Bharat

कांद्याचे दर उतरले

सध्या 50 रु. किलो, आणखी स्वस्त होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ पणजी

गेल्या अनेक दिवसापासून डोळय़ात पाणी आणणाऱया कांद्याचे दर उतरले असून ते आता रु. 50 प्रति किलोपर्यंत विकले जात आहेत. येत्या काही दिवसात ते दर आणखी उतरण्याची चिन्हे दिसत असून पूर्वपदावर येतील अशी आशा विक्रेत्यांनी प्रकट केली आहे. गोवा फलोत्पादन महामंडळाच्या विक्री केंद्रावर हा वरील दर असला तरी खुल्या बाजारात तो रु. 60 प्रतिकिलो असाच आहे. त्यामुळे हा दरही सर्वसामान्य जनतेसाठी तसा अजूनही महागच असून तो रु. 15 ते 20 पर्यंत प्रतिकिलो येवून केव्हा स्थिरावतो याची ग्राहकराजा वाट पहात आहे.

हिवाळी मोसमातील कांदा पीक येत्या दोन तीन आठवडय़ात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून खुल्या बाजारात तसेच गोव्यात येणार असल्याने त्या कालावधीत ते दर पुर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. मागील डिसेंबर महिन्यात कांदा दर रु. 100 पेक्षा जास्त झाले होते ते हळूहळू रु. 10 ते 20 ने कमी कमी होत उतरले आणि आता रु. 50 पर्यंत येऊन ठेपले आहेत.

परदेशातून आयात करण्यात आलेल्या तुर्कस्तान देशातील कांदा अजूनही बाजारात येत असून त्याचा परिणामही झाल्याने कांदा दर उतरणीला लागले आहेत. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार हे दर अजुनही महागच असून परवडणारे नाहीत. ते पूर्वपदाव यायला हवेत, अशी त्यांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.

 

Related Stories

कामावर दांडी मारणार्‍या गुरुजींचा एक दिवसाचा पगार कापणार

Archana Banage

सातारा : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात तृतीयपंथींचा गोंधळ

datta jadhav

अल्पवयीन दोन मुलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Patil_p

विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांवर गुन्हा

datta jadhav

मोठ्या विजयाची, सोप्पी गोष्ट

datta jadhav

सातारा : ना ढोल, ताशा ना गुलाल फक्त शांतता….

Archana Banage