बेळगाव : काकती येथील छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या शिवप्रेमींनी मार्लेश्वर, विशाळगड, पावनखिंड ते पन्हाळा गडभ्रमंती मोहीम नुकतीच पूर्ण केली. मार्लेश्वराच्या पायथ्यापासून गडभ्रमंतीला सुरूवात झाली. रत्नागिरी साखरपामार्गे डोंगर पार करून कोचारी या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर माचाळ येथून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. विशाळगडावर प्रवेश केल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. यानंतर पावनखिंडमार्गे पन्हाळगडावर मोहीम करण्यात आली. बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या स्मारकांची स्वच्छता व पूजन करण्यात आले. या मोहिमेची येथे सांगता झाली.


previous post