Tarun Bharat

काकती येथे पेरणी अंतिम टप्प्यात

वार्ताहर/ काकती

येथील शिवारात कडधान्य पेरणीची कामे अंतिम टप्यात असून येत्या आठवडाभर पेरणीची कामे पूर्ण होणार आहे. मोठय़ा प्रमाणात ट्रक्टरने पेरणी होत असून तुरळक बैलजोडी उरकण्यात येत आहेत.

यंदा रब्बी पेरणीच्या हंगामाला 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 दिवस अगोदर पेरणीला सुरुवात झाली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा टिकून असून थंडीही अधिक पडत असल्याने कडधान्य पेरणीपासून उगवणीपर्यंत पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा 300 एकरात जवारी, मसुरची पेरणी झाली असून वाटाणा 250 एकर, मोहरी, हरभरा व ज्वारी आदी 50 एकरात घेण्यात येत आहेत. जवारी, मसूर पेरणीसाठी रुपये, 170 ते 200 रु. प्रतिकिलो खरेदी करून शेतकऱयांनी पेरणीसाठी गुंतवणूक केली आहे. तर भाजीपाला पिक घेण्यासाठी 400 एकराचे उद्दिष्ट शेतकऱयांनी ठरविले असून प्रामुख्याने फ्लॉवर लागवडीकडे शेतकऱयांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

भात सुगी हंगामाची कामे आटोपली असून येत्या आठवडय़ाभरात रब्बी कडधान्य पेरणीची कामे संपणार आहेत.

Related Stories

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करा

Amit Kulkarni

बेळगावमध्ये उतरलं होतं टाटांचं पहिलं विमान

Amit Kulkarni

चंदगड तालुक्मयातील ऊस वादळी पावसाने जमीनदोस्त

Patil_p

निपाणीत आणखी 42 जणांची स्वॅब तपासणी

Patil_p

एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजचा जिमखाना डे

Omkar B

जागतिक स्केटिंग निवड चाचणीसाठी बेळगावच्या तिघांची निवड

Amit Kulkarni