Tarun Bharat

काकामुळे पुतण्याला कोरोनाची लागण

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाग्रस्त काकाच्या संपर्कातून पुतण्याला लागण झाली आहे. बुधवारी संकेश्वर येथील एका 12 वषीय मुलाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 55 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी संकेश्वर येथील आणखी काही भाग निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर केले आहेत.

राज्य आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या बुलेटिनमध्ये संकेश्वर येथील 12 वषीय मुलाचा (रुग्ण क्र. 524) समावेश होता. बुधवारी एका दिवसात राज्यातील 12 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात गुलबर्गा येथील 8 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नंजनगुड्ड, तुमकूर, दावणगेरे व संकेश्वर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या तबलिगी धर्मसभेत भाग घेऊन गावी परतलेल्या रुग्ण क्र. 293 च्या संपर्कातून त्याच्या बारा वषीय पुतण्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच या मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

संकेश्वर येथील बाधितांची संख्या दोनवर पोहोचली आहे. संकेश्वर येथील रहिवाशाच्या संपर्कातून बेळगाव येथे राहणाऱया त्याच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली असून तिच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल अद्याप यायचा आहे.

रुग्ण क्रमांक 293 च्या संपर्कातून त्याच्या पुतण्याला (क्र. 524) कोरोनाची लागण झाल्याने 29 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून संकेश्वर परिसरात खबरदारी वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी एक आदेश प्रसिद्ध केला आहे. पूर्वेला मगदूम कन्नड शाळा, पश्चिमेला ग्राऊंडनट सोसायटी संकेश्वर, उत्तरेला शंकर कोळी यांचे घर व दक्षिणेला हुडको कॉलनीपर्यंत खबरदारी वाढविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुन्हा टाळाटाळ

Amit Kulkarni

बलात्कार प्रकरणात अल्पवयीन मुलगी गर्भवती

Patil_p

मजगाव येथील युवकाचा भीषण खून

Omkar B

बेडकिहाळ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अभिजित लठ्ठे

Omkar B

अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा

Tousif Mujawar

नवरात्रीच्या तयारीला आली गती

Amit Kulkarni