Tarun Bharat

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील युवक पॉझिटिव्ह

Advertisements

कसबा सांगाव /प्रतिनिधी

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील एका तरुणास कोरोना संसर्ग झाल्याने त्यामुळे आता पर्यत कोरोना मुक्त राहिलेल्या मौजे सांगाव गावात कोरोना संसर्ग रुग्न आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्राम समितीच्यावतीने परिसर सील करण्यात आला असून प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरू केली आहे. खबरदारी म्हणून सात दिवस गावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. सदरचा तरुण कोल्हापूर येथील एका खासगी बँकेत नोकरीला असून कामानिमित्ताने शनिवारी (ता. ४ जुलै) रोजी चंदगड तालुक्यात मित्राला भेटण्यासाठी गेला होता.

चंदगड मधील मित्राचे वडीलांना कोरोना संसर्ग झाल्याने मौजे सांगावचा तरूण त्यांच्या संपर्कात आल्याने मित्राने त्या तरूणास कोरोना टेस्ट करण्यास सांगितले होते. दरम्यान कोणतेही लक्षणे नव्हती. परंतु त्याला तपासणी करण्यास सांगितले होते. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मध्ये त्याने तपासणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्यांचा आई वडील सह बारा जणांना तपासणी पाठवण्यात आले आहे.

Related Stories

मायणी रस्त्यालगत असणाऱ्या माळरानाला भीषण आग

Archana Banage

यंदा गणेश विसर्जन मिरवणूक नाहीच

Patil_p

विद्यापीठ निवडणूक 36346 पदवीधर मतदार ठरले पात्र

Abhijeet Khandekar

सैनिक टाकळी येथील एक पॉझिटिव्ह

Archana Banage

मतभेद दूर करण्यासाठी चीन अमेरिकेसोबत काम करण्यास तयार

Abhijeet Khandekar

पंचगंगा इशारा पातळीकडे, 10 तासांत 10 फुटांनी वाढ

Kalyani Amanagi
error: Content is protected !!