Tarun Bharat

कागल महावितरण उपविभागीय कार्यालयात आग; लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक

पेट्रोलच्या बाटल्यांमुळे आग लागल्याचा संशय

कागल/ प्रतिनिधी

येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय बुधवारी मध्यरात्री जळून खाक झाले. घटनास्थळी शिल्लक असलेल्या पेट्रोल भरलेल्या बाटल्यांमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. या आगीत सुमारे ९ संगणक व प्रिंटर संचासह वीजबीले , प्रस्ताव, माहितीअर्ज , तक्रार अर्जासह फर्निचर जळून खाक झाले. नगरपालिका जळीत घटनेनंतर कार्यालय जळून खाक होण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेची नोंद कागल पोलीसांत करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर येथील एसटी आगारासमोर व शाहू कारखाना कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयातून विज बिल भरणा , वीज बिले संबंधीच्या तक्रारी , विविध प्रस्ताव व माहिती अर्ज असे वीजेसंबंधीचे इतर कामकाज चालते. कार्यालयाच्या जवळच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच नियंत्रण कक्ष ( सबस्टेशन) आहे. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास या कार्यालयाला आग लागल्याचे शाहू कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. ते तातडीने महावितरणच्या कार्यालयाजवळ आले. त्या ठिकाणी नियंत्रण कक्षात रात्रपाळीस असलेले कर्मचारी मनोज मुसळे यांना ही कल्पना दिली. कारखान्याची सुरक्षारक्षक ओरडत आल्यामुळे निवास्थानात असलेले कर्मचारी , नागरिक घटनास्थळी जमा झाले. मुसळे यांनी कार्यालयातील वीज पुरवठा बंद केला. तसेच कारखान्याचे अग्निशमन दल तसेच कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही दलाच्या गाडीने आग विझविण्यात यश आले.

या आगीत उपविभागीय अधिकारी, ज्युनि इंजिनीनिअर कक्ष तसेच इतर विभागातील सुमारे ९ संगणक व प्रिंटर संचासह वीजबील, प्रस्ताव, माहितीअर्ज, तक्रार अर्जासह फर्निचर, पंखे जळून खाक झाले. कार्यालयाच्या आतील बाजूस व बाहेरच्या बाजूस मिळालेल्या पेट्रोल भरलेल्या बाटल्यांमुळे ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या आगीमुळे कार्यालय जळून खाक होण्याची कागलमधली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कागल नगरपालिकेचे कार्यालयाला अज्ञाताने आग लावली होती.

Related Stories

पेट्रोल-डिझेलच्या दरात 15 दिवसांनंतर कपात

Amit Kulkarni

राज्यातील घडोमोडीवर मुख्यमंत्री काय बोलणार? मुख्यमंत्री कार्यालयाकडून नविन ट्विट

Kalyani Amanagi

लडाखमध्ये बस नदीत कोसळून ७ जवानांचा मृत्यू

Archana Banage

बिहार निवडणूक : गुप्तेश्वर पांडेंविरुद्ध शिवसेना देणार उमेदवार

datta jadhav

नरंदेत ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

Archana Banage

Kolhapur : राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला, 3028 क्यूसेकने विसर्ग सुरू

Abhijeet Khandekar