Tarun Bharat

कागल तालुका समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव

प्रतिनिधी / व्हनाळी

दोन महिन्यापासून पुणे, मुंबई व इतर राज्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा हायरिस्क असलेल्या व्यक्तींनाही सर्वाधिक धोका होता. पण आता गावेच्या गावे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागली आहेत. आतापर्यंत तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरूना बाधित रुग्णांची संख्या हजारोंच्या पार गेली आहे. अनेक गावेच आता कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. यासोबतच कोणताही संपर्क नसलेल्या व्यक्तीही कोरोना बाधित आढळू लागले आहेत. त्यांचे प्रमाण जरी सध्या कमी असले तरी यातून समूह संसर्गाचा धोका निश्चितच वाढण्याची शक्यता वैद्यकीय मंडळीकडून व्यक्त केली जात आहे.

नगरपालिका प्रशासन, ग्रामपंचायत, पोलिस, आरोग्य खाते, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने कोरोना रोखण्यासाठी तब्बल तीन महिने जनजागृतीसह विविध उपाय योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे जून महिन्यापर्यंत स्थानिक पातळीवरील नागरिकांना कोरोनाची लागण झाली नव्हती. पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्थानिक पातळीवरही कोरोना बाधित रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनाचे चिंता वाढली. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सलग आठ दिवस जिल्ह्यासह तालुका लॉक डाऊन केला. तरीही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच गेली आहे परिणामी आता समूह संसर्गाचा धोका उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

आतापर्यंत प्रदेशातून प्रवास करून आलेली व्यक्ती मुंबई पुण्यासह इतर जिल्ह्यातून प्रवास करून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळत होत्या, तसेच ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत पण तो कोरोना बाधित आढळतो त्यांच्यापासून समूह संसर्गाचा धोका वाढत आहे. अशी व्यक्ती सापडणे व त्यांच्या संपर्काची कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. असे रुग्ण आता वाढू लागले आहेत त्यामुळे तालुक्याला समूह संसर्गाची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना कारणे व घरातच थांबून संसर्गापासून दूर राहणे उपायोजना आता उरली आहे.

सलग पंधरा दिवसाच्या संचारबंदी नंतर दोन दिवसापासून तालुका खुला करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही नागरिकांनी रस्ते फुलून जात आहेत. मात्र प्रशासनाने नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेण्याचे आवाहन करून सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना केली आहे. पण अजूनही सर्वत्र त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढील काळात कोरोना समूह संसर्ग धोका टाळण्यासाठी प्रशासनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे आतापर्यंत प्रवास निकट सहवासातील संसर्ग होत होता पण कोणताही संपर्क नसतानाही काही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समूह संसर्गाला सुरुवात झाली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.’ -डॉ. श्रेयस जुवेकर ( तालुका वैद्यकीयधिकारी,)

Related Stories

विशाखा समितीकडून झाली चौकशी

Patil_p

डोंगरी तालुक्यात औषधी वनस्पती प्रक्रिया संशोधन केंद्र सुरु करा

Archana Banage

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री; राऊतांचा शिंदेंना टोला

datta jadhav

अश्लील डान्स करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

Archana Banage

काऊदऱयावर जानाई-मल्हारच्या साक्षीने निसर्गपूजा उत्साहात

Patil_p

लॉकडाऊन काळासह नियमित वापरातील वीज बीलातील स्थिर आकार रद्द करा

Archana Banage