Tarun Bharat

काजल शिकतेय तलवारबाजी

इंडियन 2 चित्रपटासाठी विशेष तयारी

अभिनेत्री काजल अग्रवाल स्वतःच्या आयुष्यातील सर्वोत्तम टप्प्यात आहे. काजल काही महिन्यांपूर्वी आई झाली असून ती स्वतःच्या मुलासमवेत प्रत्येक क्षणाला सुंदर  स्वरुप देत आहे. परंत याचबरोबर तिने स्वतःच्या नव्या चित्रपटाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. काजल सध्या ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे.

काजलने आता मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी चित्रपटासाठी ती तयार करत आहे. मार्शल आर्टसोबत ती तलवारबाजी शिकत आहे. कलारीपयट्टू हे एक प्राचीन भारतीय मार्शल आर्ट आहे, कलारीपयट्टूचा अर्थ युद्धभूमीतील कलांचा अभ्यास’ असा होतो. कलारीयपट्टूचा वापर सर्वसाधारणपणे गुरिल्लायुद्धासाठी केला जायचा. हा एक सुंदर अभ्यास असून यामुळे साधकाला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सशक्त होता येते. या आर्टमुळेच शाओलिन, कुंग फू, कराटे अणि तायक्वांडोचा जन्म झाल्याचे मानले जात असल्याचे काजलने म्हटले आहे.

काजल आता कमल हासन यांच्या ‘इंडियन 2’ या चित्रपटातून मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटासाठी ती कसून तयारी करत आहे. चित्रपटासाठी मार्शल आर्ट शिकण्याचे पाऊल तिने उचलले आहे. मुलाच्या जन्मानंतर माझ्या शरीराचा स्टॅमिना भले कमी झाला असला तरीही माझा काम करण्यासाठीचा निर्धार पूर्वीसारखाच आहे. मी अत्यंत उत्सुक असून नव्या गोष्टी शिकण्यासाठी आतुर असल्याची ती म्हणाली.

Related Stories

छोटय़ा पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री

Patil_p

IIFA Awards 2022: सलमानचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, शोभता का…

Kalyani Amanagi

रीयाच्या अडचणी वाढल्या; आता 20 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Tousif Mujawar

ऐश्वर्या राय बच्चन व आराध्यालाही कोरोनाची लागण

Tousif Mujawar

34 वर्षांनी होणार ‘तेजाब’चा रिमेक

Patil_p

राज ठाकरे यांच्या हस्ते 8 दोन 75

Patil_p