Tarun Bharat

काजू, नारळ फेणी आता वारसा पेय

राज्य सरकारकडून धोरण अधिसूचित : फेणी जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी /पणजी

गोवा फेणीचे धोरण सरकारने अधिसूचित व प्रकाशित केले असून त्यात काजू आणि नारळ या दोन्ही फेणींचा समावेश केला आहे. हे धोरण तातडीने अंमलात आणण्याचे सरकारने ठरविले असून अबकारी आयुक्त कार्यालयातर्फे ते राबविण्यात येणार आहे. या फेणीला पारंपरिक वारसा पेय म्हणून मान्यता देण्यात आली असून ते जागतिक पातळीवर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. पर्यटकांमध्ये ते जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याचा सरकारचा मानस असल्याचे धोरणात नमूद केले आहे.

फेणीचे उत्पादन खरेदी – विक्री यावर देखरेख ठेवण्याचे काम अबकारी आयुक्त कार्यालय करणार असून सर्व संबंधितांशी चर्चा करुन हे धोरण तयार करण्यात आल्याचा दावा सरकारने अधिसूचनेतून केला आहे. या फेणी उद्योगातील तक्रारी दूर करण्यासाठी लवकरच प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे. फेणीला उत्तेजन, प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम, प्रचार – प्रसार करण्यात येणार आहेत. त्याची नोंद पर्यटन कॅलेंडरवरही होणार असल्याचे धोरणात नमूद केले आहे. देशभर, जागतिक स्तरावर पर्यटनासह फेणीचा वापर करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात त्याचा समावेश करण्यात आला असल्याचे धोरणात स्पष्ट केले आहे.

Related Stories

अखंड ज्ञान साधनेमुळेच जीवन सफल झाले

Amit Kulkarni

गरज पडल्यास आयआयटी विरोधात मुख्यमंत्री निवासस्थानी आंदोलन करणार

Omkar B

कोरोनाचा एकही मृत्यू नाही, 198 नवे रुग्ण

Patil_p

विश्वासार्हता म्हणजे ‘लोकमान्य’ सोसायटी

Patil_p

मंदिरांना ‘मॉल’व तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

Amit Kulkarni

पशुखाद्य दरवाढीवरून दुध उत्पादकांची डेअरी गेटसमोर धरणे

Patil_p