Tarun Bharat

काटगाळीनजीक अपघातात दोन ठार

Advertisements

बहिण – भावावर काळाचा घाला

 वार्ताहर / खानापूर

बेळगाव खानापूर मार्गावरील काटगाळी गावानजीक कमलनगर येथे एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिण भाऊ ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली.

रेणुका रमेश युग्गर (वय 28) आणि कमलेश करेप्पा करवी (वय 25) अशी अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही देसुर येथील डेपो येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवा बजावत होते.

डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी डंपरखाली आल्याने हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्या रेणुका हिचा विवाह झाला होता. तिच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

Related Stories

एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, विश्रुत स्ट्रायकर्स यांची विजयी सलामी

Amit Kulkarni

बसमधील आयसीयुला मुख्यमंत्र्यांकडून चालना

Amit Kulkarni

भात पिक पाण्याखाली …शेतकरी चिंतेत

Patil_p

शासनाने बाजार समितीमधील महसूल रद्द करावा

Patil_p

नागपूर, जयपूर, बेंगळूरला विमानफेरी सुरू करा

Amit Kulkarni

नूतन पोलीस आयुक्तांनी सुत्रे स्वीकारली

Patil_p
error: Content is protected !!