Tarun Bharat

काडेपेटीत मावणारी साडी

Advertisements

तेलंगणाच्या विणकराकडून निर्मिती

पश्मीना  (उबदार आणि नरम वस्त्र) विषयी तुम्ही ऐकले असेल, ज्याला दुकानदार अंगठीमधून बाहेर काढून दाखवत असतो. भलेही पश्मीना अंगठीमधून बाहेर पडत असली तरीही एका काडेपेटीत पॅक होऊ शकते का? जरा विचार करा जर पश्मीना काडेपेटीत मावू शकत नसल्यास त्यात साडी कशी पॅक होऊ शकेल?  परंतु तेलंगणाच्या एका हातमाग विणकराने हे शक्य करून दाखविले आहे.

या विणकराने तयार केलेली साडी काडेपेटीत सामावते. सोशल मीडियावर या साडीची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. तसेच लोक विणकराच्या कामाचे कौतुक देखील करत आहेत.

हे उत्तम कार्य करणाऱया विणकराचे नाव नाल्ला विजय असून तो राजन्ना सिरसिल्ला जिल्हय़ाचा रहिवासी आहे. विजयने मंगळवारी स्वतःची ही विशेष साडी मंत्री सबिता इंद्रारेड्डी यांना भेट म्हणून प्रदान केली आहे. अशाप्रकारची साडी तयार करण्यास सुमारे 6 दिवसांचा कालावधी लागत असल्याचे विजयने सांगितले आहे.

इतकी आहे किंमत

साडी तयार करण्यास यंत्राचा वापर केल्यास हे काम दोन दिवसांमध्येही पूर्ण होऊ शकते असे ते सांगतात. पारंपारिक हातमागावर विणल्यास या साडीची किंमत 12 हजार रुपये इतकी आहे. तर यंत्रावर तयार करण्यात आलेल्या साडीची किंमत 8 हजार रुपये आहे. सोशल मीडियावर विजयच्या या कौशल्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

Related Stories

पाकिस्तानात जन्माला आली अनोखी बकरी

Patil_p

गारठलेल्या चिनी सेनेकडून ‘माईंड गेम’चा अवलंब

Patil_p

अतिधनाढय़ांचा दुबईकडे ओढा

Amit Kulkarni

देवदूत ठरलेला ऍम्ब्युलन्सचालक

Patil_p

आनंद मेळाव्यातून चिमुकल्यांनी केले नववर्षाचे जल्लोषात स्वागत

prashant_c

इराणमधील ‘मॅग्नेट मॅन’चा विश्वविक्रम

Patil_p
error: Content is protected !!