Tarun Bharat

काणका सर्कल जवळील रस्त्यावरील बेकायदेशीर गाळे काढण्याचा इशारा

उद्यापासून धडक मोहीम हाती घेणार

प्रतिनिधी/ म्हापसा

काणका सर्कल ते काणका विश्वाटी विश्वेश्वर शिवसंकर मंदिर व श्री साखळेश्वर मंदिर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला ये-जा करीत असताना फळ, भाजी विक्रेते, कपडे विक्रेते, प्लास्टिक विक्रेते बेकायदेशीररीत्या आपले सामान विक्री करण्यास बसत असल्याने या बाजूला वाहतूक करणाऱया वाहन चालकांना याचा बराच त्रास होतो. शिवाय हे अपघाताला कारण बनत असून याची दखल घेत नागरिकांनी पंचायतीकडे व पोलीस स्थानकातही तक्रार दिल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या बाजूला कुणीही बसू शकत नसल्याचे कारण पुढे करून वेर्ला काणका पंचायतीचे सरपंच मिल्टन मार्कीस यांनी याची दखल घेत या रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीररीत्या बसणाऱयांवर कारवाई& करीत काही जणांचा माल ताब्यात घेतला तर येथील सर्व विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून या ठिकाणी यापुढे बसू नये असे सूचित केले आहे.

अशा बेकायदेशीररीत्या बसणाऱयांवर सोमवारपासून कडक मोहीम उघडणार असल्याची माहिती यावेळी मार्कीस यांनी दिली. येथील सर्व विक्रेत्यांना सरपंच मिल्टन मार्कीस, पंच लक्ष्मीकांत बिचोलकर, दिगंबर कळंगुटकर, वासुदेव कोरगावकर, पंचायत सचिव भेलदास कारापूरकर आदी उपस्थित होते. पंचायतीचे सर्व पंच येथे एकत्रित आले आहे. आज सर्वांना इशारा देण्यात आला असून रविवारपासून येथे कुणीही बेकायदेशीररीत्या रस्त्याच्या बाजूला सामान विक्रीस घेऊन बसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेत सर्वजण भाग घेईल. परत येते बसल्यास त्यांचे सर्व सामान जप्त करण्यात येईल अशी माहिती सरपंच मिल्टन मार्कीस यांनी दिली. यापूर्वी आम्ही व सचिव यांच्याकडून कारवाई करण्यात आली होती. महिन्यापूर्वी त्यांना नोटीसही बजाण्यात आली होती. रस्ता रुंदिकरणाच्या जागेत कुणालाही बसण्यास देण्यात येणार नाही असे ते म्हणाले. यापूर्वी पंच सागर लिंगुडकर यांनी याबाबतही तक्रार दिली होती व ते स्थानिक पंचावर आरोप करीत आहे असे सरपंचांना विचारले असता सागरनी फक्त येथे फोटो वा पॅमेरा फिरवून राहण्यापेक्षा येथे ते आले असते तर बरे झाले असते. अशा मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे येथील विक्रेत्यांना तुम्हाला कुणी बसविले असे विचारल्यास ते त्याच सदस्यांचे नाव सांगतात असा आरोप सरपंचांनी केला. कोविड काळात खाण्यास नव्हते तेव्हा आम्ही या लोकांना बसविले होते. आता वॉर्निंग नाही थेट कारवाई करण्यात येईल असे मार्कीस म्हणाले.

Related Stories

पुरातत्व खात्यातील कागदपत्रांचे लवकरच डिजिटायझेशन

Omkar B

आज गणेश पूजनाने चतुर्थी उत्सवास प्रारंभ

Patil_p

’इफ्फी’ म्हणजे भाजपसाठी ’इंटरनल फिक्सिंग पॅस्टिवल’

Amit Kulkarni

ग्राम पंचायतीसाठी 10 ऑगस्टला मतदान

Omkar B

25 गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या व्याख्यानाचे ध्वनिचित्रमुद्रण

Amit Kulkarni

नेत्रावळी अभयारण्यातही आग

Amit Kulkarni