Tarun Bharat

काणकोणचे कदंब बसस्थानक जलमय

Advertisements

प्रतिनिधी / काणकोण

मान्सूनपूर्व पावसाने दिलेल्या तडाख्यात काणकोणच्या कदंब बसस्थानकावरील दुकानांत पाणी शिरल्याने या ठिकाणच्या व्यावसायिकांचा बराच माल खराब झाला आहे. मागच्या  दोन दिवसांपासून या तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. त्यातच वादळी वाऱयाचा परिणाम या व्यावसायिकांना भोगावा लागत असून संपूर्ण बसस्थानक जलमय झाले आहे.

या बसस्थानकाच्या छप्परावर पत्रे बसविण्याचे काम सध्या चालू असून मागच्या पंधरा दिवसांपासून हे काम चालू आहे. एका बाजूचे खराब झालेले पत्रे हटविणे आणि त्या जागी नवीन बसविण्याचे काम पूर्ण झालेले आहे. खराब झालेले पत्रे हटविणे, त्यानंतर लोखंडी खांबांना रंग काढणे यामुळे त्याचप्रमाणे बसस्थानक मोठे असल्यामुळे काम पूर्ण व्हायला थोडा विलंब झाला आहे. तरी देखील येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याची हमी ठेकेदाराने दिली आहे.

Related Stories

जाती धर्माचे राजकारण करणाऱया पक्षांना थारा देऊ नये

Amit Kulkarni

म्हादईप्रश्नी शक्य ते सर्व प्रयतन जारी

Patil_p

नागेश करमली, स्नेहा सबनीस यांना पुरस्कार

Amit Kulkarni

कोरोनाच्या धास्तीमुळे बाणस्तारी बाजाराला ग्राहक भेटेना

Patil_p

गोव्यासाठी ‘गती शक्ती’ मास्टर प्लॅन

Amit Kulkarni

चला लागा निवडणुकीच्या कामाला

Amit Kulkarni
error: Content is protected !!