Tarun Bharat

काणकोणात आढळले 11 कोविड रुग्ण

प्रतिनिधी / काणकोण

कालपरवापर्यंत 1 कोरोनाबाधित असलेल्या काणकोण तालुक्यात 26 रोजी एकाच दिवशी 11 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यातील 5 रुग्ण आगेंद पंचायत क्षेत्र, 3 गावडोंगरी, तर 3 नगरपालिका क्षेत्रातील आहेत. दुसऱया बाजूने, कोविड महामारीच्या काळात आघाडीवर राहून काणकोण तालुक्यातील ज्या सरकारी व अन्य कर्मचाऱयांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती त्या कर्मचाऱयांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम चालू करण्यात आला असून दोन दिवसांत या तालुक्यातील नगरपालिका, पोलीस आणि अन्य खात्यांमधील कर्मचाऱयांना ही लस देण्यात आली आहे. याकामी डॉ. स्नेहा चोडणकर, डॉ. क्लेसा, परिचारिका वर्षा आणि नीना यांनी सहकार्य केले.

Related Stories

माविन गुदिन्हो यांची साई चाफेरान मंडळाच्या नवरात्री उत्सवाला भेट

Amit Kulkarni

बाणावलीतील मच्छीमारांकडून 5 कासवांना जीवदान

Omkar B

म्हापशात खुबे काढताना युवकाचा नदीत बुडून मृत्यू

Omkar B

पेडणेत कॅसिनो विरोधात एल्गार, सहा ठराव मंजूर

Patil_p

पर्ल कोलवाळकर, डेन कुयेल्हो यांना सेलिंगमध्ये राष्ट्रीय रौप्यपदके

Patil_p

चिखली वास्कोतील महामार्गावर वृक्ष कोसळला, वाहतुक अन्य मार्गांवर वळवली

Amit Kulkarni