Tarun Bharat

काणकोणात मास्क न वापरता फिरणाऱया 60 जणांना दंड

प्रतिनिधी / काणकोण

काणकोणच्या पोलिसांनी मास्क न वापरणाऱयांवर कडक कारवाई सुरू केली असून 22 रोजी एकाच दिवशी मास्क न वापरता फिरणाऱया 60 जणांना दंड दिला. काणकोणच्या किनारपट्टीवर सध्या देशी पर्यटक गर्दी करायला लागले आहेत. सीमेवरून गोव्यात प्रवेश करताना परिधान केलेले मास्क गोव्यात प्रवेश केल्यानंतर बरेच जण वापरत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हमरस्त्यावर देखील पोलिसांनी तपासणी चालू ठेवली असल्याची माहिती काणकोणचे निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. शाळा सुरू झालेल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या भागांतून मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्याकडे यायला लागले आहेत. अशा वेळी आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे मत गावस यांनी व्यक्त केले.

Related Stories

योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे काणकोणात काँग्रेसकडून दहन

Patil_p

शिरगाव ग्रामसभेत खाण प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा ठराव

Amit Kulkarni

मतदार भरघोस मतांनी निवडून देतीलः मोन्सेरात

Amit Kulkarni

गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज वधू-वरांच्या नशिबी प्रतीक्षाच…

Omkar B

वाळपई काँग्रेस गट समितीतर्फे पोलीस, संबंधित कर्मचाऱयांचे अभिनंदन

Omkar B

पूनम पालयेकर यांचे कौशल्य ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये

Amit Kulkarni