Tarun Bharat

काणकोणात 45 वर्षांवरील पूर्ण लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज

Advertisements

आज पैंगीण, लोलये येथे लसीकरण मोहिमेचे आयोजन

प्रतिनिधी / काणकोण

आतापर्यंत काणकोण तालुक्यातील 45 वर्षांवरील ज्या व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लस घेतलेली आहे त्यांचे सर्वेक्षण करतानाच येत्या आठवडाभरापूर्वी उर्वरित सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने काणकोणच्या प्रशासनाने गंभीररीत्या लक्ष दिलेले आहे. पहिल्या टप्प्यात आज 13 रोजी पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयात आणि लोलयेच्या दामोदर विद्यालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम हातात घेण्यात आला आहे. सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी काणकोणच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱया शासकीय कर्मचाऱयांना नियुक्त करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी स्वतः विनायक वळवईकर यांनी ध्वनिक्षेपकाच्या आधारे जागृती केली आहे.

पैंगीण येथील कर्मचारी पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयात आणि लोलयेचे कर्मचारी दामोदर विद्यालयात पाठविण्यात येणार आहेत. सध्या परिचारिका कमी पडायला लागल्यामुळे अतिरिक्त 15 परिचारिकांना कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार आहे. शिवाय काही स्वयंसेवकांना 15 दिवसांचे खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती वळवईकर आणि उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी दिली.

काणकोणातील कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारी यंत्रणा आता सज्ज झाली असून 12 रोजी काणकोणच्या सरकारी विश्रामधामात आयोजित विशेष बैठकीला उपसभापती इजिदोर फर्नांडिस, आयएएस अधिकारी गर्ग, विशेष अधिकारी वळवईकर, दीपक देसाई, जॉन्सन फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी प्रभुदेसाई, मामलेदार विमोद दलाल, गटविकास अधिकारी गुरुदत्त नाईक, सीडीपीओ आशंका गावकर, आरोग्याधिकारी डॉ. तावारीस, पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

सध्या काणकोण आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांवर अतिरिक्त ताण आलेला आहे. त्यामुळे काणकोणच्या विविध खात्यांमध्ये जे अतिरिक्त कर्मचारी आहेत त्या सर्वांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून कोरोना महामारीतील सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन उपसभापती फर्नांडिस यांनी केले आहे. दरम्यान, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी पुरस्कृत केलेले 30 व्हॅक्सिनेटर संच फर्नांडिस यांनी काणकोणच्या आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केले आहेत. सध्या शेळेर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात लसीकरणासाठी झुंबड उडाली असून यापुढे आगोंद आणि खोल पंचायतींमध्ये स्वतंत्ररीत्या ही मोहीम राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना चालू असल्याची माहिती मामलेदार दलाल यांनी दिली.

Related Stories

आडपई येथील सायकलींग मॅराथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

संयुक्तपणे पाहणी करुनच म्हादईबाबत निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री

Patil_p

फुटिरांकडे काँग्रेस ढुंकूनही बघणार नाही

Amit Kulkarni

ठाण्याहून आलेल्या दांपत्याला कोरोना

Patil_p

प्रत्येक निवडणूक फायनलच अन् प्रत्येक मतदार महत्त्वाचा

Patil_p

खलाशांना गोव्यात आणण्याबाबत लक्ष घालणार

Omkar B
error: Content is protected !!