Tarun Bharat

काणकोण तालुक्यातील 35 युवकांकडून रक्तदान

प्रतिनिधी / काणकोण

‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची गरज भासणार हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून काणकोणचे काही युवक रक्तदानासाठी पुढे सरसावले असून या युवकांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले आहे.

यामध्ये पैंगीण, काणकोणचे प्रमोद कामत, अनिल कामत, पंकज ना. गावकर, वेदांत ज्ञानानंद प्रभुगावकर, नंदीप भगत, जयराज पुराणिक, अंकुर भट, प्रभव फळगावकर, ओंकार प्रभुगावकर, शिवम वारीक, अक्षय पेडणेकर, ओंकार पै खोत, पराग कामत, दया भट, पद्मनाभ भट, सर्वेश आचार्य, वैकुंठ भट, विपुल भट, प्रतिकेश भट, नीतेश गोसावी, विराज पै खोत यांनी रक्तदान केले आहे. आतापर्यंत काणकोणच्या 35 युवकांनी रक्तदान केलेले असून आणखी प्रत्येकी पाच युवकांच्या दोन तुकडय़ा लवकरच रक्तदान करतील, अशी माहिती अनिल कामत यांनी दिली.

कसलेही संकट आल्यावर माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी येथील जनता नेहमीच पुढे सरसावलेली आहे. मग तो महापूर असो अथवा वादळाने झालेले नुकसान असो. कोरोना मारामारीमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतियांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी येथील धार्मिक संस्था पुढे आल्या, काही सामाजिक संस्थांनीदेखील खारीचा वाटा उचलला. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांचा विचार करून सध्या अत्यंत गरज असलेल्या रक्ताचा पुरवठा करण्यासाठी काणकोणच्या युवकांनी केलेले हे रक्तदान लाखमोलाचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतानाच या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे.

पैंगीण येथे दि. 20 रोजी रक्तदान शिबिर

दरम्यान, युवा काणकोणकर या संस्थेने दि. 20 रोजी सकाळी 10 वा. श्री वेंकटेश  देवस्थान आणि थालसामिया संस्था, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पणसखंडे-पैंगीण येथील श्री वेंकटेश देवालयाजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करू इच्छिणाऱयांनी अंकुर भट (8806354565), वेदांत प्रभुगावकर (9922354221), पराग कामत, श्रीकांत गावकर किंवा अक्षय पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. 

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, काणकोण लायन्स क्लब आणि मडगाव जेसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 22 जणांनी रक्तदान केले. या शिबिरात काणकोण, कुडचडे, मोबोर, शिरोडा, बाणावली, राय, नावेली भागांतील आणि सासष्टीतील लायन्स व जेसीशी निगडीत युवकांचा समावेश राहिला. हॉस्पिसियो इस्पितळाचे आरोग्याधिकारी डॉ. रविन रेगो यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या रक्तदान शिबिरास सामाजिक कार्यकर्ते आल्प्रेड फर्नांडिस, लक्षता खांडेपारकर, काणकोण लायन्स क्लबचे अध्यक्ष ऍड्रियान टोरीस, सिस्टर सँड्रा रॉड्रिग्स, सांतान रिबेलो, तंत्रज्ञ कृष्णा जुवारकर यांनी सहकार्य केले. जेसीआयचे समन्वयक प्रतीक सामंत यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले.

Related Stories

भिवपाची कांयच गरज ना!

Patil_p

समान नागरी कायदा देशभरात लागू होणे आवश्यक

Amit Kulkarni

फलोत्पादन महामंडळ भरारी पथक नेमणार

Amit Kulkarni

साळगाव मतदारसंघाच्या विकास कामाबद्दल माजी मंत्री जयेश साळगावकरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Amit Kulkarni

पंचायतींची पाटी अद्याप कोरीच

Patil_p

फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे 15 रोजी महालसेला नमन

Amit Kulkarni