Tarun Bharat

काणकोण पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ

प्रतिनिधी / काणकोण

कोव्हिड-19 च्या संसर्गाच्या भीतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असताना काणकोण पालिकेने रेंगाळलेली मान्सूनपूर्व कामांची प्रक्रियाही सुरू केली आहे. एरव्ही मे महिना संपण्यापूर्वी पालिकेच्या दहाही प्रभागांतील गटारांची सफाई, गटारात साचलेला गाळ काढणे त्याचप्रमाणे नवीन लाद्या बसविणे ही कामे पूर्ण करण्यात येत असत. त्यातल्या त्यात चावडी आणि पाळोळे प्रभागांमध्ये पावसाचे पाणी लगेच साचून त्याचा फटका रस्त्याच्या बाजूच्या घरांना बसण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे चावडी प्रभागातील गटारांच्या सफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी प्रीतादास गावकर यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. नगराध्यक्षा नीतू देसाई, स्थानिक नगरसेविका छाया कोमरपंत यांनी स्वतः उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतानाच लॉकडाऊनच्या अटी न मोडता आणि रस्त्यावर उगाच गर्दी होऊ न देता गटारांची सफाई व नवीन लाद्या बसविण्याचे काम सुरू केले आहे. यानंतर पाळोळे वॉर्डातील कामाला प्रारंभ करण्याकडे आपण लक्ष देणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक दिवाकर पागी यांनी दिली.

Related Stories

गोवा डेअरीचा सरकरने संजिवनी साखर कारखाना करू नये

Amit Kulkarni

दहशतवादाच्या सर्वाधिक वेदना झेलणारे राहुल गांधी

Amit Kulkarni

सत्तरीत प्रवासी वाहतुकीत सुधारणा करणार

Amit Kulkarni

रमेश तवडकर यांची भाजप राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चावर निवड

Amit Kulkarni

येणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपा मोठय़ा विजयाच्या तयारीत

Patil_p

सावर्डेत झालेल्या महिलेच्या खुनाचा नवव्या दिवशी छडा

Patil_p