Tarun Bharat

वेंगुर्ले कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक व गृहोपयोगी वस्तूंचे वितरण

Advertisements

पुण्यातील श्रीकर वर्ल्ड फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी

वार्ताहर/ओटवणे
पुणे येथील श्रीकर वर्ल्ड फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत वेंगुर्ले येथील २२ कातकरी कुटुंबांना जिवनावश्यक व गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी साडी, सतरंजी, चादर, टॉवेल, खाद्यपदार्थ आदी वस्तूंचे कातकरी समाजाला वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोकण विभाग समन्वयक रघुनाथ सावंत, सुयोग जाधव, आशिष नाईक, आयुष नाईक, हरीश सावंत आदी उपस्थित होते. कातकरी समाजाला या वस्तुंचे वितरण करण्यासाठी शितल आंगचेकर व सोनाली आंगचेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी कातकरी समाजाने श्रीकर वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले. श्रीकर वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेने यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे व सरमळे तसेच रायगड जिल्ह्यातील महाड येथील पूरग्रस्तांना कपडे, चपला आदी धान्यादी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले होते.

Related Stories

97 अधिकारी-कर्मचारी पदे निर्माण

NIKHIL_N

अखेर सिंधुदुर्गसाठी ‘नीट’चे केंद्र मंजूर

NIKHIL_N

शिरोडा-वेळागर येथे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आ. केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

Ganeshprasad Gogate

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कार्यभार स्वीकारला

NIKHIL_N

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास हजाराचा दंड

NIKHIL_N

पत्रकारांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

NIKHIL_N
error: Content is protected !!