Tarun Bharat

काथ्या व्यवसायाला उभारी देणार!

Advertisements

 सी. एम. मिश्रा यांचे प्रतिपादन : देशातील 25 क्वायर क्लस्टरची होणार

 तपासणी : निरवडे येथील सनराईज क्वायरची तपासणी होणार

वार्ताहर / वेंगुर्ले:

 देशातील क्वायर क्लस्टर व क्वायर उद्योगांना उभारी देण्याच्या उद्देशाने येथील केंद्रीय सुक्ष्म व लघुउद्योग मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमार्फत देशातील सुमारे 25 क्वायर क्लस्टरची तपासणी करण्यात येणार आहे. यात जिल्हय़ातील मालवण-पेंडुर, सावंतवाडी-निरवडे येथील क्वायर क्लस्टरचा समावेश आहे. या उद्योगातील समस्या व अडचणी जाणून घेऊन काथ्या व्यवसायाचे मजबुतीकरण करून रोजगार व स्वयंरोजागारात वाढ केली जाणार आहे, अशी माहिती दिल्ली येथील केंद्रीय सुक्ष्म व लघुउद्योग मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिय़ूट ऑफ मॅनेजमेंट लखनौचे डायरेक्टर सी. एम. मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी श्री. कृष्णा, श्री. इंद्रजीत, क्वायर बोर्डाचे हैदराबाद येथील सूर्यप्रकाश गौड, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग क्वायर विभागाचे श्री. विष्णू, अरविंद गायकवाड आदी पथक वेंगुर्ल्यात दाखल झाले आहे. या पथकाने महाराष्ट्रातील क्वायरची मातृसंस्था असलेल्या महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेला सर्वप्रथम भेट दिली. यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन व काथ्या प्रकल्पांचे मार्गदर्शक एम. के. गावडे, काथ्या संस्थेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या संचालक प्रवीणा खानोलकर, नीलम क्वायर औद्योगिक संस्थेच्या गीता परब, सनराईज क्वायर औद्योगिक संस्थेच्या श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगांवकर, शिल्पा सावळ, मनीषा भगत क्लस्टरच्या सी. डी. ई. अश्विनी पाटील, अरुणा परब, मनीषा परब आदींचा समावेश होता.

या क्वायर कस्टरची तपासणी व क्लस्टरमधील सर्व संचालकांना येणाऱया सर्व प्रकारच्या समस्या, सदरचा उद्योग सुरू होताना या प्रकल्पात काम करणाऱया व्यक्तींची या उद्योगाबाबतची मानसिकता व उद्योगामुळे या भागात वाढू शकणारा रोजगार व स्वयंरोजगार, या प्रकल्पासाठी लागणारा कच्चामाल उपलब्ध करणे,  स्वयंरोजगार वाढविण्याबरोबरच काम करणाऱया महिला स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतात. या विविध पद्धतीची माहिती सी. एम. मिश्रा यांच्यासह पथक संचालक मंडळ सदस्य तसेच यात प्रत्यक्ष काम करणाऱया महिलांकडून घेतली जाणार आहे. 

Related Stories

‘तौक्ते’ नुकसानीची पाहणीसाठी केंद्रीय पथक रविवारी सिंधुदुर्गात

Anuja Kudatarkar

‘फेम इंडिया’ लोकप्रिय पोलीस अधिकाऱयांत डॉ.गर्ग

Patil_p

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस बंद

Archana Banage

मालवण तालुका गाबित समाजतर्फे ‘आम्ही गाबित’ अभियान राबविणार

Anuja Kudatarkar

टेम्पोच्या धडकेत चारवर्षीय मुलाचा मृत्यू

NIKHIL_N

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत मधुरा पाटीलचे यश

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!