Tarun Bharat

कामगारांच्या अनुदानासाठी ‘माकप’चे सोलापुरात आंदोलन

सोलापूर, प्रतिनिधी

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने राज्य सरकार कडून विडी,यंत्रमाग, रिक्षा व असंघटित कामगारांना रोख 10 हजार  अनुदान व केंद्र सरकार कडून आयकर न भरणाऱ्या व्यक्तीला दरमहा 7 हजार 500 शे रुपये आर्थिक मदत व अनलॉक पूर्णपणे संपेपर्यंत माणसी 10 किलो धान्य देण्याची मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी कुलीच्या वेषभूशात 1 लाख अर्जाचे गाढे ओढले. 

राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल,मुख्यमंत्री यांच्याकडे 1 लाख वैयक्तीक अर्ज व त्या त्याची सविस्तर माहिती असणारे  कॉम्प्याक्ट डिस्क (CD) सादर करणार असून हे अर्ज  आज रोजी 3 जुलै सकाळी 11 वाजता  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हाती जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिष्टमंडळाच्या वतीने अभिनव व अनोख्या पद्धतीने सुपूर्द करण्यात आले.  

Related Stories

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे हा राज्यातील 33 टक्के जनतेचा विश्वासघात – नितीन राऊत

Archana Banage

महाराष्ट्रात लससाठा तीन दिवसांपुरताच

Archana Banage

नृसिंहवाडीसह परिसरात १९ कोरोना रुग्णांची भर

Archana Banage

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांना अपघात

Tousif Mujawar

अनिल परबांना मोठा झटका, ई़डीकडून कोट्यावधींची संपत्ती जप्त

Archana Banage

कोण म्हणतं मी म्हातारा झालो? शरद पवारांच्या एका वाक्यावर हशा आणि टाळ्यांचा कडकडाट

Archana Banage