Tarun Bharat

कामगारांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी आता दैनंदिन पास

सातारा / प्रतिनिधी

शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील विविध उद्योग घटकांमध्ये सातारा जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कामगार कामास आहेत. तसेच विविध शासकीय, निमशासकीय विभागामाधील अधिकारी – कर्मचारी, खाजगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि सर्व बँक कर्मचारी यांना देखल सातारा जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वारंवार कामावर जाण्यासाठी ये-जा करावी लागते. त्याअनुषंगाने दैनंदिन पास विरीत करण्यासाठी अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सातारा शेखर सिंह यांनी या आदेशानुसार खालील प्रमाणे नमुद केलेले अधिकारी यांना त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या विभागामधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी व कामगार यांना सातारा जिल्ह्यातून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सतारा – औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खाजगी आस्थापना.

तहसिलदार कराड, पाटण व खटाव – सर्व शासकीय विभाग व सर्व बँक आस्थापना.

गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कराड, पाटण व खटाव – खाजगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये.

प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकारी यांनी संबंधित अधिकारी-कर्मचारी व कामगारांना पास वितरीत करण्यापूर्वी अधिकारी, कर्मचारी व कामगारांची पुढील कागदपत्रे तपासून दि. 30 जून पर्यंतचे दैनंदिन पास देण्याबाबतची कार्यवाही करावी. व्यक्ती काम करीत असलेल्या आस्थापनेचे प्रमाणपत्र. व्यक्ती सातारा जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत आधारकार्ड किंवा इतर रहिवास इ. पुरवा. व्यक्तीचे ओळखपत्र.

वरील आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) कलम 188 अन्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण ; एकुण रुग्णसंख्या ११० तर ३५ जणांची कोरोनावर मात

Archana Banage

सातारा : सेल्फीने घेतला पसरणीतील युवकाचा बळी

Archana Banage

शाहूपुरीत ज्येष्ठ नागरिकांना घरी जावून लसीकरण

Patil_p

आमदार पडळकर यांचे राज्यभर घोंगडी बैठकांचे आयोजन

Archana Banage

सातारा : कोरोना लढाईत ‘राहत केअर सेंटर’चे मोलाचे योगदान – ना. बाळासाहेब पाटील

Archana Banage

आता योग्य व्यक्ती होणार ‘ग्रामपंचायतीचा प्रशासक’

Patil_p