नवी दिल्ली : राष्ट्रीय कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघानेही सामील होण्याची घोषणा केली आहे. संपाचे आवाहन केंद्र सरकारच्या कथित कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच तीन नवे कामगार कायदे संमत करत 27 जुन्या कायद्यांचे उच्चाटन केले आहे. याच्या विरोधातच संप पुकारण्यात आला आहे. भारतीय मजदूर संघ वगळता 10 केंद्रीय कामगार संघटनांनी यात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.


previous post
next post