Tarun Bharat

कामगार संघटनांच्या ‘भारत बंद’ला राहुल गांधींचा पाठिंबा

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधर्थ विविध कामगार संघटनांनी आज, भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी समर्थन दिले आहे.

राहूल गांधी यांनी याबाबत ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘मोदी-शाह यांच्या सरकारद्वारे लागू केलेल्या जनविरोधी, कामगारविरोधी धोरणांनी देशात बेरोजगाराची स्थिती तयार केली आहे. तसेच, यासोबत पीएसयू ला कमकुवत केले जात आहे. यामुळे देशातील 25 कोटी कर्मचाऱयांनी बंद पुकारला आहे. तर मी त्या सर्व कर्मचाऱयांना सलाम करतो.

दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्ये सार्वजनिक बँका, परिवहन विभाग, पोस्ट ऑफीस व शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला आहे.

 

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न, तिघेजण जेरबंद

Patil_p

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

Tousif Mujawar

विक्रमी 28,472 रुग्णांना डिस्चार्ज

Patil_p

2024 पर्यंत देशात अमेरिकेसारखे रस्ते!

Patil_p

एस. जयशंकर यांचा परदेश दौरा अर्ध्यावरच

datta jadhav

‘अग्निपथ’ला आव्हान देणाऱया सर्व याचिका फेटाळल्या

Patil_p