Tarun Bharat

कामराळ – कुडचडे येथील अपघातात दुचाकीस्वार जखमी

Advertisements

प्रतिनिधी / कुडचडे

कामराळ, कुडचडे येथे दुचाकी व ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून सदर व्यक्तीला काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. कुडचडे पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

कामराळ गावात ही घटना घडली. या ठिकाणी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. सदर कामासाठी आणलेले ट्रक व इतर वाहने प्रत्येक दिवशी धावत असतात. तसेच त्यांना वेळेची मर्यादा नसून संपूर्ण दिवस तसेच मध्यरात्री सुद्धा येथे वाहनांची वर्दळ बेशिस्तपणे सुरू असते. दुपदरीकरणाच्या कामामुळे अगोदरच परिसरातील लोक हैराण झालेले आहेत. त्यात झालेल्या या अपघातामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सदर रस्ता गावातून जात असल्यामुळे येथे लहान मुले फिरत असतात, रस्त्यावर सायकल चालवत असतात तसेच ज्ये÷ नागरिक फेऱया मारत असतात. त्यामुळे दुपदरीकरणाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱया वाहनांना गावात ये-जा करण्यासाठी मर्यादित वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यात कुडचडे-काकोडा पालिका, जिल्हाधिकारी तसेच स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, असेही त्यांच्याकडून सूचविण्यात आले आहे. अन्यथा पुढे गावात अपघात घडल्यास त्याला कोण जबाबदार असणार असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Related Stories

सतत पावसामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रातील हॉटमिक्स डांबरीकरण बंद

Omkar B

मुरगावात भाजपाला कथीत वासनाकांड भोवले

Amit Kulkarni

खाण पट्ट्या शेतकर्‍यांन समोर अनेक प्रश्न

GAURESH SATTARKAR

चिरडणाऱया पोलिसास निलंबित करा

Omkar B

झुआरीनगरात कुंपण कोसळून एक जखमी, जोरदार पावसात किरकोळ पडझडीच्याही घटना

Amit Kulkarni

गोव्याचे निसर्गसौदर्य जपण्यासाठी आंदोलन उग्र करू

Patil_p
error: Content is protected !!