Tarun Bharat

कामावर दांडी मारणार्‍या गुरुजींचा एक दिवसाचा पगार कापणार

सीईओ विनय गौडा यांच्याकडून गट शिक्षणाधिकार्‍यांना खरमरीत पत्र

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यातील गुरुजींनी कोरोनाच्या लसी घेतल्या आहेत. आता लढायच्या वेळेला हेच शिक्षक घरात बसून राहू लागले आहेत. त्याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा यांच्याकडे गेलेल्या आहेत. तसेच त्यांनीही स्वतः काही लसीकरण केंद्रावर भेट दिलेली आहे. त्यांच्याही निदर्शनास आले की, शिक्षकच जाग्यावर नसतात. त्यामुळे गुरुजींनी जर कामात हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर त्या दिवसाचा पगार कापल्याची कडक कारवाई होणार आहे. तसे पत्रच गट शिक्षणाधिकार्‍यांना काढण्यात आले आहे.

कोरोनाची ड्युटी लावली म्हणून काही शिक्षक तक्रारी करत आहेत. काहीजण आपल्या इतर पदाचा वापर करुन प्रशासनाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणू पहात आहेत. मात्र, नेमून दिलेल्या जबाबदारीच्या ठिकाणी हे शिक्षक जात नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यात जिल्हा परिषदेकडून कोरोनाच्या अनुषंगाने शिक्षकांना दिलेल्या जबाबदारीमध्ये आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत सर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिक, खाजगी शाळांतील शिक्षक यांनी लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, नागारी आरोग्य केंद्र या ठिकाणी उपस्थित राहून वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवून दिलेल्याप्रमाणे आयसीएमआर पोर्टल, कोव्हीड 19 पोर्टल, कॉन्टॅक ट्रेसिंग, डाटा अपडेटींग व इतर कोव्हीड-19 बाबत अनुषंगिक माहिती भरण्याबाबत आदेश दिले गेलेले आहेत. मात्र, या आदेशानुसार नेमून दिलेल्या ठिकाणी शिक्षक काम करत नाहीत. त्याबाबत वरीष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे जिह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना शिक्षकांच्या कामात हलगर्जीपणा, कामात टाळाटाळ करत असल्याचे आढळून आल्यास त्या दिवसाचे विनावेतन कपात करुन त्याच्या विरोधात प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे आदेश सीईओ विनय गौडा यांनी जिह्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांना दिलेले आहेत.

Related Stories

सातारा जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू, 203 नवे रुग्ण

Archana Banage

साताऱयात चेनस्नेचरची टोळी जेरबंद

Patil_p

दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

Patil_p

सातारा : बसस्थानक परिसरात वाहतूक शाखा व अतिक्रमण विभागाची कारवाई

Archana Banage

तत्कालीन अध्यक्षांसह 27 जणांविरोधात गुन्हा दाखल

Patil_p

कण्हेर योजनेचे पाणी शाहुपूरीकरांच्या घरात लवकरच

Patil_p