Tarun Bharat

“काम झालेले नसतानाही पंतप्रधानांकडून मेट्रोचे उद्घाटन”

ऑनलाईन टीम / तरुण भारत

विरोधी पक्षांनी आरोप केल्याप्रमाणे युक्रेन – रशिया युद्ध सुरु झालं असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप प्रचारात व्यस्त होते. तसेच युद्धाच्या भडक्यात भारतीय नागरिक आणि विद्यार्थी पुरते अडकले असताना पंतप्रधान हिमालयातील शंकर मंदीरात डमरु वाजवत आहेत. असा ही आरोप त्यांच्यावर होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांनी काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन असा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळ्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. यावरुनच पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“देशाचे पंतप्रधान उद्या या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले.

Related Stories

चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरुवारी देशव्यापी संपावर

Archana Banage

सातारा जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी

Archana Banage

”महाराष्ट्रात कोरोना लसींचे फक्त १४ लाख डोस शिल्लक”

Archana Banage

साताऱयात होणार प्रथम दर्जाचे ट्रामा केअर युनिट

Patil_p

कोरोनाविरोधी लढय़ात सैन्य बजावणार मोठी भूमिका

Patil_p

देशाला उद्ध्वस्त करणार बेगडी धर्मनिरपेक्षता

Patil_p