Tarun Bharat

कायद्याचा अभ्यास करणाऱयांवरच अन्याय

कर्नाटक स्टेट लॉ युनिव्हर्सिटीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना हुबळी येथील कर्नाटक स्टेट लॉ युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठाकडून चुकीचे निर्णय घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करून युजीसी नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना पुढील सत्रात थेट प्रवेश द्यावा, या मागणीसाठी सोमवारी लॉ चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. चन्नम्मा चौकापासून आंदोलन करत जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले.

कोरोनामुळे लॉ कॉलेजचे वर्ग ऑनलाईन घेण्यात आले. व्यवस्थित अभ्यासक्रम शिकविला गेला नसल्याने देशातील सर्वच कायदा विद्यापीठांनी अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी प्रवेश दिला. मात्र कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश दिला नाही. विद्यापीठाकडून चुकीचे निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले. तीन वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षे झाला तरी अद्याप पूर्ण झालेला नाही. पाच वर्षाचा अभ्यासक्रम सहा वर्षे लागली आहेत. विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे.

युजीसीने सर्व लॉ विद्यापीठांना परवानगी देऊनदेखील कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठ मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. याविरोधात सोमवारी राज्यभर लॉ शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. बेळगावमधील विद्यार्थ्यांनी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने केली. आम्हाला आमचा हक्क द्या, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला होता. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले. यावेळी बेळगाव परिसरातील लॉ चे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

कारवार जिल्हय़ात कोरोनाबाधितांनी गाठला दोनशेचा टप्पा

Amit Kulkarni

जमखंडीत कॅसिनो जुगारावर छापा

tarunbharat

बेळगाव शहरात प्रगतीपरची सत्ता

Omkar B

हलगा-मच्छे बायपासमधील एजंट आले अडचणीत

Patil_p

रस्त्याच्या विकासापूर्वी ड्रेनेजवाहिनीची दुरुस्ती करा

Amit Kulkarni

मतदार याद्या तपासण्यासाठी तज्ञ व्यक्तींची नेमणूक करा

Amit Kulkarni