Tarun Bharat

काय आहे प्लाझ्मा थेरपी ?

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्याचे दोन दा स्वॅब घेतले जातात. त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याच्या रक्तातील प्लाझ्मा घेण्यात येतो. हा संकलित प्लाझ्मा कोरोनातील हायरिस्क रूग्णांवर वापरला जातो, त्याला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात, अशी माहिती सीपीआर रक्तपेढीतून देण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूशी सामना करणारी प्रतिजैविके नाहीत, पण त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने तो बरा होतो, कोरोनामुक्त होतो, अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच्या दोन स्वॅब चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर घेतला जातो. नवीन प्रतिजैविके तयार झाल्याने बऱया झालेल्या व्यक्तीच्या शरिरातील प्लाझ्मा कोरोना बाधित झालेल्या दुसऱया रूग्णाच्या शरिरात ही प्रतिजैविके सोडली जातात. फक्त त्यासाठी संबंधित रूग्ण कोरोनामुक्तीनंतर त्याच्यात कोणतीही लक्षणे नसावीत, रूग्णाच्या शरीरात कोरोनाच्या ऍण्टीबॉडीज असाव्यात, या प्लाझ्मा थेरपीला आयसीएमआर संस्थेची तसेच अन्न, औषध प्रशासनाची मान्यता असावी, असे निकष आहेत.

डॉ. सतीश पुराणिक म्हणाले, कोरोनामुक्त रूग्णाच्या शरीरात ऍण्टीबॉडीज तयार होतात, कोरोना विषाणूने प्रवेश केल्यास शरीरातील सैनिक, पांढऱया पेशी लढण्यास सक्रीय होतात. कोरोनामुक्त रूग्णाच्या शरीरातील प्लाझ्मामध्ये ऍण्टीबॉडीज असतात. त्याचा वापर हायरिस्क रूग्णांतील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त तरूण एखाद्याचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

सीपीआरमधील डॉ. वरूण बाफना म्हणाले, तातडीच्यावेळी रूग्णासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर होतो. सध्या उपचार घेणाऱया रूग्णांच्या सहमतीने त्याच्या रक्तातील प्लाझ्मा घेण्यात येतो. अन् तो हायरिस्क रूग्ण, त्याच्या कुटुंबियांच्या संमतीने वैद्यकीय सल्ल्यानुसार रूग्णाला दिला जातो, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

अनुदान द्या अन्यथा तीव्र आंदोलन…

Archana Banage

दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के?

Archana Banage

कोल्हापुरात आणखी 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

बनावट जमिन वाटप आदेशप्रकरणी बैठक घ्या

Archana Banage

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका

Tousif Mujawar

दापोलीत दुकानदारांवर पथकाची नजर, नियम भंग झाल्यास होणार कारवाई

Archana Banage