Tarun Bharat

काय करील साबण

Advertisements

पहाटे दूध आणायला गेलो होतो. रांगेत बराच मागे होतो. माझ्याच वयाचा एक आजोबा रांगेतून बाजूला होऊन एका दगडावर बसला होता. त्याचा नंबर जवळ आल्यावर तो दगडावरून उठला आणि रांगेत शिरला. तेव्हा माझ्या मागे उभी असलेली एक छोटी मुलगी ओरडली, “ए बाबा, मध्ये काय घुसतोस?’’

“मी रांगेतच आहे. पाय दुखतात म्हणून बाजूला बसलो होतो.’’

“खोटं बोलू नकोस. तू रांगेतच घुसतो आहेस. मुकाटय़ाने मागे येऊन उभा रहा.’’

“हे पहा, ते आजोबा खरोखरच रांगेत उभे होते,’’ मी तिला सांगू लागलो.

“तू कोण मध्ये नाक खुपसणारा? मध्ये बोलू नकोस.’’

आता मात्र माझा राग अनावर झाला. एवढय़ा लहान मुलीशी कसं भांडावं हे समजेना. तेवढय़ात त्या मुलीच्या मदतीला आणखीन मुलगा आला. “काय गं? काय झालं?’’ त्यानं तिला विचारलं.

“बघा ना, तो समोरचा माणूस रांगेत घुसतोय. आणि हा माझ्या समोरचा माणूस त्याची बाजू घेऊन माझ्याशीच भांडायला येतोय, जरा दोघांना ठणकवा,’’ ती म्हणाली.

मनात आलं, काय अगोचर कार्टी आहे. आम्हाला म्हाताऱया माणसांना अरेतुरे करून उद्धटपणे भांडायला येतेय आणि त्या बारक्मया पोराला अहोजाहो करतेय. बहुतेक तिचा भातुकलीतला नवरा असावा. ‘भातुकलीतला नवरा’ या कल्पनेने मला खुदकन हसू आलं. त्यामुळं ती दोन्ही मुलं भडकली.

“काय रे? ही एकटी दिसली म्हणून हिच्याशी दादागिरी करत होतास काय? आणि आता दात काय काढतोस? स्वतःला काय समजतोस तरी काय रे?’’ तिचा मित्र माझ्याशी भांडू लागला.

“आधी तू कोण आहेस रे, चिंटय़ा? तुला तिचा का पुळका आला? तुझा आणि तिचा काय संबंध? आणि तुम्हा दोघांवर आईवडिलांनी संस्कार वगैरे केलेत की नाही? आम्हाला वडीलधाऱयांना अरेतुरे करून बोलताय?’’

“मला चिंटय़ा म्हणायचं काम नाही, सांगून ठेवतोय. आणि ती माझी बायको आहे. मी तिचा नवरा आहे. तिची बाजू मी घेणारच.’’

हे ऐकून रांगेतले सगळे हसू लागले.

तो पुढे बोलतच होता, “आणि वडीलधारे कोण? तुम्ही? आम्ही दोघे तुमच्या सर्वांपेक्षा म्हातारे आहोत. दंतुर साबणाने रोज आंघोळ करून आम्ही लहान दिसू लागलोय.’’

Related Stories

मताला लसीची फोडणी

Patil_p

टाटा मोटर्सची खास सवलत योजना

Patil_p

पुन्हा उद्रेकाची लक्षणे

Amit Kulkarni

अर्जुनाकडून द्रुपद पराभूत

Patil_p

वादग्रस्त राज्यपाल, हतबल मुख्यमंत्री

Patil_p

ठामपणा अंगीकारताना…

Patil_p
error: Content is protected !!