Tarun Bharat

कारच्या ठोकरीने सदाशिवनगर येथील तरुण ठार

कणबर्गी डोंगरावर अपघात, सेल्फी काढत थांबलेल्या तरुणांना कारची धडक

प्रतिनिधी /बेळगाव

कारच्या ठोकरीने सदाशिवनगर येथील तरुण जागीच ठार झाला तर आणखी एक तरुण जखमी झाला. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कणबर्गी श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील डोंगरावर ही घटना घडली असून वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. डोंगरावर सेल्फी काढत थांबलेल्या तरुणांना कारची धडक बसून हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

आदित्य विश्वनाथ करडी (वय 19, रा. सदाशिवनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र मदन मुत्ताप्पा कट्टी (वय 18, रा. शिंदोळी) हा जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य व मदन हे दोघे विद्यार्थी आहेत. शुक्रवारी सकाळी हे मित्र कणबर्गी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेले होते. आपली दुचाकी रस्त्याशेजारी उभी करुन डोंगरावर सेल्फी काढताना डोंगरावरुन उतरणाऱया कारची धडक बसून हा अपघात झाला आहे.

दोन तरुणांना ठोकरुन कार रस्त्याशेजारी कलंडली. आदित्य हा कार खाली सापडला. अपघातग्रस्त कारमध्ये दोघे जण होते. ते बचावले. वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

Related Stories

निपाणी-चिकोडीतील सात बंधारे पाण्याखाली

Omkar B

नागेनहट्टी येथील उमेदवार एक मताने विजयी

Patil_p

लोकमान्य ऑर्थोपेडिक्सची बेळगावात गुडघेदुखी-सांधेदुखीसाठी खास ओपीडी

Amit Kulkarni

आर.के.लक्ष्मण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राजकीय व्यंगचित्रकार

Patil_p

नेरसा-गवाळी नदी-नाल्यांवर लोखंडी पूल उभारणीस वनखात्याची परवानगी

Amit Kulkarni

भर पावसाची मराठी पत्रकांसाठी मराठी भाषिकांचा एल्गार

mithun mane