Tarun Bharat

कारदगा येथे तिसऱया आघाडीतर्फे पेन्शन वितरण

वार्ताहर/ कारदगा

येथील तिसऱया आघाडीच्यावतीने दिलीप शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन मंजुरीपत्रांचे वितरण व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. धनाजी शेवाळे यांना सुजित मिणचेकर फाऊंडेशनकडून आदर्श शिक्षक पुरस्कार, दिलीप उगळे यांची कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, सुरेश शास्त्री यांची कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, सुरेश कोणे यांची कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ सचिवपदी निवड झाल्याबद्दल, माणकापूरचे संदीप बन्ने (वकील) व अमोल चौगुले यांचा सदलगा येथे 5 जणांचा नदीमध्ये बुडताना जीव वाचविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सत्कारानंतर पेन्शन मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी संजय गावडे, सुभाष ठकाणे, सोमराया गावडे, उत्तम मुरकुंडे, किरण सदलगे, सचिन जाधव, राहुल रत्नाकर, सुदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. राजू कुराडे यांनी सूत्रसंचालन, विजय कचरे यांनी स्वागत, ग्रा. पं. सदस्य राजू खिचडे यांनी प्रास्ताविक तर किरण सदलगे यांनी
आभार मानले.

Related Stories

चित्राकृतीतून ‘केबीं’चे अस्तित्व चिरंतन

Amit Kulkarni

फॅशनव्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

Omkar B

जायंट्स सखीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

गुलमोहर बागच्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

शिक्षिकेचा मुलगा आंतरराष्ट्रीय डॉन कसा झाला?

Tousif Mujawar

विद्यार्थ्यांनी नवनवीन संधींचा लाभ घ्यावा

Amit Kulkarni