Tarun Bharat

कारमध्ये डॉक्टरांचे घर

Advertisements

कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर तसेच परिचारिका स्वतःच्या कुटुंबापासून अंतर राखत आहेत. स्वतःच्या माध्यमातून हा संसर्ग घरात प्रवेश करू नये याकरता ते खबरदारी घेत आहेत. याच कारणामुळे रुग्णालयातून बाहेर पडल्यावरही अनेक आरोग्य कर्मचारी घरी जात नाहीत. भोपाळच्या रुग्णालयात कार्यरत डॉक्टरने तर एका कारमध्येच ठाण मांडले आहे.

रुग्णालयात कोरोनाच्या अनेक संशयितांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना बाधितांचे नमुने घेण्यासाठी जात असतात. अशा स्थितीत त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. याच कारणामुळे डॉक्टर सचिन नायक यांनी कारमध्येच स्वतःचे घर केले आहे. गरजेच्या सर्व वस्तू कारमध्येच ठेवत मागील 7 दिवसांपासून ते त्यातच राहत आहेत.

घरात 3 वर्षीय मूल

रुग्णालय परिसरातच 7 दिवसांपासून कारमध्ये वास्तव्य करून आहे. घरात 3 वर्षांचे मूल असून या सर्वांना संसर्गापासून दूर राहण्यासाठी कारमध्येच राहण्यास प्रारंभ केल्याचे नायक यांनी सांगितले.

कर्तव्यनिष्ठेला सलाम

डॉक्टर नायक यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी छायाचित्र ट्विट करत कोविड-19च्या विरुद्ध लढत असलेल्या योद्धय़ांना मी तसेच संपूर्ण मध्यप्रदेश सलाम करत असल्याचे म्हटले आहे. याच संकल्पासह वाटचाल केल्यास हे महायुद्ध आम्ही लवकरच जिंकू असे उद्गारही त्यांनी काढले आहेत.

29 आरोग्य कर्मचाऱयांना लागण

मध्यप्रदेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 268 वर पोहोचली आहे. यात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचाही समावेश असून त्यांची संख्या 29 आहे. अशा स्थितीत आता डॉक्टर तसेच परिचारिकांनी विशेष खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. अनेकांनी स्वतःच्या कुटुंबाला अन्यत्र हलविले आहे. भोपाळचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुधीर डेहरिया स्वतःच्या कुटुंबाला घराबाहेर उभे राहूनच भेटत आहेत.

Related Stories

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे

Omkar B

कोरे झाल्यावर तरी खरे वीजबिल निघणार?

Patil_p

काँग्रेस नेत्याची बेताल बडबड

Patil_p

निष्पापाला पाहून मारेकऱयाचे मन बदलले

Patil_p

रुग्णालयातील आगीत मध्यप्रदेशमध्ये 8 ठार

Patil_p

जम्मू सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन

Patil_p
error: Content is protected !!