Tarun Bharat

कारला लागलेल्या आगीत काँग्रेस नेते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / पिंपळगाव : 

काँग्रेस नेते आणि मीग येथील द्राक्ष निर्यातदार संजय चंद्रभान शिंदे यांच्या कारला मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने ही आग आणखी भडकल्याने गाडी आतून लॉक झाली. अथक प्रयत्न करूनही गाडीबाहेर पडता न आल्याने शिंदे यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिपंळगाव बसवंत टोल प्लाझा येथे ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे साकोरे मीग येथील रहिवासी आहेत. द्राक्षांच्या छाटणीनंतर बागेच्या फवारणीसाठी लागणारी किटकनाशके घेण्यासाठी ते काल दुपारी पिंपळगावला निघाले होते. दुपारी 12 च्या सुमारास गाडी मुंबई-आग्रा महामार्गाला लागताच  गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने ही आग आणखी भडकली. गाडी आतून लॉक झाल्याने त्यांना गाडीबाहेर पडता आले नाही. 

स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र, ते निष्फळ ठरले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीची काच फोडली. त्यानंतर शिंदे यांना गाडीबाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

Related Stories

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा मुहूर्त ठरला

Abhijeet Shinde

कोल्हापूर : करडवाडीत क्रांती दिनानिमित्य तमाम क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन

Abhijeet Shinde

तापमान वाढ कायम

Patil_p

नवे चार पॉझिटिव्ह, बरे होणाऱ्यांचे शतक पूर्ण

Abhijeet Shinde

KOLHAPUR; विठ्ठला ! कोणता झेंडा घेऊ हाती? नेत्यांच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शिवसैनिक द्विधामनस्थितीत

Rahul Gadkar

तासगाव तालुक्यात तीन दिवसात एक ही मृत्यू नाही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!