Tarun Bharat

कारवाईची भिती घालून 25 लाखांच्या लाचेची मागणी

10 लाख रुपये स्विकारताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दोघे पोलीस जेरबंद

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

स्क्रॅप वाहन जप्त करुन त्याआधारे खोटा गुन्हा दाखल करुन मोकाच्या गुह्यात अडकवण्याची धमकी देवून 25 लाखांच्या लाचेची मागणी करुन 10 लाख रुपये स्विकारणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय केरबा कारंडे (वय 50 रा. उंचगांव ता. करवीर), पोलीस नाईक किरण धोंडिराम गावडे (वय 37 रा. केदारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी पोलीस मुख्यालयाच्या शेजारीच ही कारवाई करण्यात आली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या मुलग्याचा वाहन विक्री दुरुस्ती व स्क्रॅप करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी पनवेल येथून एक स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. ती बाई स्क्रॅप करण्यासाठी कोल्हापूरात आणली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे, पोलीस नाईक किरण गावडे यांना मिळाली होती. या दोघांनी फिर्यादी यांच्या मुलास मंगळवार (18 जानेवारी) रोजी पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बोलावून घेतले. तसेच त्याची गाडीही ताब्यात घेतली. तु चोरीच्या 50 हून अधिक दुचाकी विकल्या आहेस. तुझ्यावर गुन्हा दाखल करतो तसेच मोका अंतर्गत कारवाई करतो अशी धमकी या दोघांनी फिर्यादीच्या मुलास दिली. दिवसभर मुख्यालयात थांबवून घेवून सायंकाळी उशिरा त्याला घरी सोडले. यानंतर त्याला दुसऱ्या दिवशीही बुधवारी त्याला पोलीस मुख्यालयात बोलावून घेतले. तुला मोकातून सोडवायचे असेल तसेच हे प्रकरण याच ठिकाणी मिटवायचे असेल तर एकरकमी 25 लाख रुपये दे अशी मागणी केली. यानंतर रात्री उशिरा त्याला घरी सोडले. फिर्यादीच्या मुलाने ही बाब वकील असणाऱ्या वडीलांना सांगितली. यानंतर गुरुवारी सकाळी विजय कारंडे व किरण गावडे यांनी फिर्यादीच्या मुलास फोन केला. 10 लाख रुपये आजच्या आज आणून दे असे सांगितले. तसेच रक्कम घेवून पोलीस मैदान येथील अलंकार हॉल येथे बोलाविले. यावेळी फिर्यादी व त्यांच्या मुलग्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली. याबाबतची रितसर तक्रार दिली. यानंतर फिर्यादीचा मुलगा सायंकाळच्या सुमारास अलंकार हॉल येथे विजय कारंडे व किरण गावडे यांना भेटण्यास गेला. यावेळी विजय व किरण यांनी 10 लाख रुपये कुठे आहेत. अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादीच्या मुलग्याने रक्कम देण्यासाठी आजचा दिवस लागेल बँकेतून व मित्रांकडून रक्कम गोळा करत आहे, असे सांगितले. यानुसार शुक्रवारी दुपार पर्यंतची वेळ फिर्यादीच्या मुलग्याने मागून घेतली. यावेळी या दोघांनी लाच मागितल्याचे नियमाप्रमाणे सिद्ध झाले.

यानुसार शुक्रवारी दुपारी लाचलुचपत विभागाने पोलीस मुख्यालयाच्या आवारात सापळा रचला. फिर्यादी व त्याचा मुलगा 10 लाख रुपयांची रोकड घेवून पोलीस मुख्यालयानजीक आले. त्यांनी विजय कारंडे व किरण गावडे यांना याची माहिती दिली. या दोघांनी पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असणाऱ्या बिनतारी संदेश कार्यालयाच्या येथे थांबण्यास सांगितले. या ठिकाणी विजय कारंडे याची अलिशान मोटार उभी होती. याजवळ फिर्यादी व त्याचा मुलगा जावून थांबले. पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्वे अन्वेषण कक्षात असणारे विजय व किरण मोटारीजवळ आले. त्यांनी फिर्यादी व त्याच्या मुलास पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. या दोघांनी रक्कम दाखविल्यानंतर रक्कम मोटारीत ठेवण्यास सांगितली. यानुसार फिर्यादीने बॅगेतून आणलेली रक्कम मोटारीमध्ये ठेवली. याचवेळी सापळा रचलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विजय कारंडे व किरण गावडेस जेरबंद केले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल मयुर देसाई, नवनाथ कदम, विकास माने, सुनिल घेसाळकर, रुपेश माने, चालक सुरज अपराध यांनी ही कारवाई केली.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये नियम पाळत चित्रिकरणाला परवानगी द्या

Abhijeet Shinde

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

Sumit Tambekar

सत्ता आल्यास मराठा समाजाला आरक्षण

Abhijeet Shinde

राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेत मजूर महिला गंभीर जखमी

Abhijeet Shinde

मलकापुरातील बाजारपेठ सुरु होणार, नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई

Abhijeet Shinde

स्पीकरची परवानगी कोणी दिली ; भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव यांचा आक्षेप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!