Tarun Bharat

कारवारमध्ये अट्टल दरोडेखोराला अटक

चोरीचे साहित्यही जप्त : अन्य सहा जणांचे पलायन

प्रतिनिधी / कारवार

कारवार शहराच्या व्याप्ती प्रदेशात आणि जिल्हय़ातील अन्य ठिकाणच्या राष्ट्रीय हमरस्त्यावर प्रवाशांना धाक दाखवून दरोडा घालण्याच्या व आठवडय़ाचा बाजार, यात्रा आदी ठिकाणी मोबाईलची चोरी करणाऱया शिमोगा जिल्हय़ातील भद्रावती व शिकारीपूर येथील सात जणांच्या टोळीतील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रकाश देवराजू यांनी दिली.

ते कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असीफ अब्दुल रेहमान (वय 35 रा. हळीयूर, ता. शिकारीपूर) असे असून टोळीतील अन्य सहा जण फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करून देवराजू पुढे म्हणाले, दरोडे घालण्याच्या आणि चोरी करण्याच्या इराद्याने सात जणांचा समावेश असलेली ही टोळी केए 02 एमएच 4151 क्रमांकाच्या कारमधून शिमोगा जिल्हय़ातील शिकारीपूर येथे दाखल झाली. त्यानंतर राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 (पणजी-मंगळूर) करून गोवा आणि कारवारकडे ये-जा करणाऱया नागरिकांकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने लुटण्याची योजना त्यांनी बनविली
होती.

त्यानुसार रविवारी रात्री (सोमवारी पहाटे) कारवार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैतखोल येथील सिद्धरामेश्वर मठाजवळच्या राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर कारसह दाखल झाले आणि मिरची पावडर, नायलॉन दोरी, लाठय़ा, लोखंडी अवजारांसह रस्त्यावर थांबले होते. यावेळी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक एस. संतोषकुमार आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी असीफ अब्दुल रेहमान यांना ताब्यात घेतले आणि दरोडा व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात यश आले.

तथापि, टोळीतील अन्य सहा जणांना तेथून पळून जाण्यात यश आले. फरारी झालेल्यांचा कसून शोध आणि अधिक तपास कारवार शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान दरोडे आणि चोरीचा कट पोलिसांनी हाणून पाडल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Stories

शहरातील उपनगरांमध्ये स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन

Patil_p

टेम्पररी वीज मीटरसाठी दोन महिन्यांचे डिपॉझिट एकाचवेळी

Amit Kulkarni

सरकारी बांधकामासाठी परवानगीची गरज नाही

Omkar B

विकासासाठी कोटीचा खर्च; देखभालीकडे कानाडोळा

Amit Kulkarni

ग्राम पंचायत निवडणूक, क्लब रोडवर वाहतूक बंदी

Patil_p

बंद घरे लक्ष्य, सात लाखाचा ऐवज लंपास

Patil_p
error: Content is protected !!