Tarun Bharat

कारवार जिल्हय़ात गुरुवारी तीन कोरोनाबाधित

प्रतिनिधी / कारवार :

कारवार जिल्हय़ात गुरुवारी तीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 99 इतकी झाली आहे. आज कोरोना बाधा झालेल्यामध्ये हल्याळ येथील 21 वर्षीय युवतीचा आणि दांडेली येथील 24 वर्षीय युवकाचा व 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आलेल्या हल्याळ येथील युवतीला सात दिवस इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्या युवतीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. होम क्वारंटाईनमध्ये असताना तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान किम्समध्ये उपचार घेत असलेल्या तीन बाधितांना कोरोनावर मात करण्यात यश आले. कोरोनावर मात करून आज घरी परतलेल्या तीन बाधितांमध्ये कारवार तालुक्यातील एका 45 वर्षीय महिलेचा आणि 18 व 20 वर्षीय सिद्धापूर तालुक्यातील युवतींचा समावेश आहे. आज अखेर कोरोनावर मात करून घरी परतलेल्या बाधितांची संख्या 85 इतकी झाली आहे. अद्याप येथील किम्समध्ये 11 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आणि या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे किम्सचे संचालक डॉ. गजानन नायक यांनी सांगितले. आज कोरोनाची लागण झालेल्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार घेणाऱयांची संख्या 14 इतकी होणार आहे, असे सांगण्यात आले.

Related Stories

विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मकता पेरा

Patil_p

स्मार्ट कामाचा तिढा; नागरिकांना बसतोय वेढा

Patil_p

उचगाव येथील शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

Omkar B

क्रिकेट मास्टर, सिद्धकला, शहापूर स्पोर्ट्स, साईराज संघ विजयी

Amit Kulkarni

व्यवसाय परवान्यांची शहरात तपासणी

Amit Kulkarni

गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सला नॅक मूल्यांकनात ‘ए’ नामांकन

Amit Kulkarni