Tarun Bharat

कारवार जिल्हय़ात शनिवारी 164 कोरोनाबाधित

प्रतिनिधी/ कारवार

कारवार जिल्हय़ात शनिवारी 164 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 71 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये हल्याळ आणि अंकोला तालुक्यातील प्रत्येकी एका मयताचा समावेश आहे. दरम्यान, कारवार तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी कारवार तालुक्यात 62 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. परिणामी कारवार तालुक्यात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

 जिल्हय़ातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कारवार तालुक्यात बाधितांच्या संख्येत मोठी वाढ का होते आहे, याचे नेमके कारण समजू शकले. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने बेंगळूरसह अन्य ठिकाणी वास्तव्य करून असलेले कारवार तालुकावासीय आपल्या मूळ गावी परतत असल्यामुळे तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे, असे सांगितले जात आहे. शनिवारी नोंद झालेल्या बाधितांमध्ये कारवार तालुक्यातील 62 बाधितांसह शिरसी 21, कुमठा 19, यल्लापूर 18, हल्याळ 12, अंकोला 10, होन्नावर 5, मुंदगोड 4, सिद्धापूर 10, जोयडा 2 आणि भटकळ तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

71 जण कोरोनामुक्त

शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या 71 बाधितांमध्ये कारवार तालुक्यातील 24, हल्याळ 15, कुमठा 13, शिरसी 8, सिद्धापूर 4, होन्नावर 3, भटकळ आणि यल्लापूर तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. कोरोनामुळे जिल्हय़ात आजअखेर 203 रुग्ण दगावले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या 966

आता जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 966 इतकी झाली असून यापैकी 130 बाधितांवर जिल्हय़ातील वेगवेगळ्य़ा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात आजअखेर 17 हजार 35 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 15 हजार 866 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

Related Stories

कार्तिक वारीही प्रतिकात्मकरित्या साजरी करा

Omkar B

मनपा आयुक्त-आरोग्य अधिकाऱयांकडून रेल्वे स्थानकाची पाहणी

Amit Kulkarni

बलिदान मासची सोमवारी होणार सांगता

Amit Kulkarni

भाऊराव काकतकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Patil_p

ई-कचऱयाचे व्यवस्थापन प्रत्येकाची जबाबदारी

Amit Kulkarni

हुतात्म्यांना अभिवादन, मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Patil_p