Tarun Bharat

कारवार बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर

प्रतिनिधी /बेळगाव

रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर काम युद्धपातळीवर सुरू असून बसथांब्याच्या छताचे काम सुरू आहे. छताचे पत्रे बसवून हे काम तातडीने पूर्ण करून बसस्थानक सुरू करण्यात येणार आहे.

दक्षिण भागातील जनतेच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकासमोर बसस्थानक सुरू करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत येणाऱया बसस्थानकावर पणजी, वास्को, कारवार, जोयडा, रामनगर, कॅसलरॉक अशा लांब पल्ल्याच्या बससह दक्षिण भागातील स्थानिक बसेस येत असतात. पण या ठिकाणी प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सध्या बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले असून व्यापारी गाळे उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. बसस्थानकाच्या बसशेल्टर उभारणीचे काम सुरू आहे. सध्या बसस्थानकाच्या ठिकाणी निवारा शेड बनविण्यात येत आहे. हे काम पूर्णत्वास आले असून छताचे पत्रे बसविण्याचे काम शिल्लक आहे. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण करून बसस्थानक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बनविण्यात येत असलेले बसस्थानक सुसज्ज बनणार आहे. गाळय़ांचे काम पूर्ण झाले असून बसस्थानकाच्या आवारात फरशा बसविण्याचे काम करण्यात येत आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

वैभव भारतमातेसाठी करायचे आहे!: रामदेवबाबा

Amit Kulkarni

कोगनोळी नाक्यावरील चार पोलिसांना कोरोना

Patil_p

सीबीटीच्या तळमजल्यासाठी तब्बल चार वर्षे!

Amit Kulkarni

परिवहनच्या कुरिअर सेवेला वाढतोय प्रतिसाद

Amit Kulkarni

रामलिंगखिंड गल्ली, अनसुरकर गल्ली, नेहरूनगर येथे लसीकरण

Amit Kulkarni

कुदनूर येथील अतिक्रमण कारवाई लांबणीवर

Amit Kulkarni