Tarun Bharat

कारागृहात अमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी योगेश पागीला अटक

Advertisements

प्रतिनिधी/ म्हापसा

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात डय़ुटी बजावत असलेल्या आरआयबीच्या पोलिसांनी तुरूंग रक्षक सुरज गावडे (रा. जॉफिलनगर फोंडा) याला कैद्यांना अमली पदार्थ   घेऊन जाताना मुख्य गेटवर तपासणीवेळी कोकेनसह ताब्यात घेतल्यावर चौकशीअंती त्याने आपले सहकारी टॅक्सी चालक योगेश पागी (24, रा. काणकोण) याची माहिती दिल्यावर म्हापसा पोलिसांच्या सहकार्याने काणकोण पोलिसांनी काल रात्री पागी यांच्या घरावर छापा घालून त्याला अटक केली असून त्याने गुह्याची कबुली दिली आहे.

योगेश पागी हा ड्रग पॅडलर असून तो आंगोद येथील रहिवासी आहे. तुरूंग रक्षक सुरज गावडे याला योगेश पागी याने अमली पदार्थ पुरविले होते, अशी माहिती उघड झाल्यावर कोलवाळ पोलिसांनी त्याला अटक केली. ही दुसरी अटक असून योगेशला  ड्रग्स कोण पुरवितो याची चौकशी सुरू आहे. ड्रग्स पुरविणारी ही एक  टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. सुरज हा कैदी विकट भगत व अन्य कैद्यांना अमली पदार्थ पुरवत होता अशी माहिती पोलीस चौकशीत उघड झाली असून त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.

पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक कुणाल नाईक, हवालदार सुधीर परब, शिपाई सुलेश नाईक, आयआरबी हवालदार विशांत मांद्रेकर यांनी ड्रग पॅडलर योगेश पागी याला आंगोद काणकोण येथे घरी जाऊन पकडले.

कैदी विकट भगत हा काणकोण येथील असून खूनप्रकरणी तो कोलवाळ येथे शिक्षा भोगत आहे. हा योगेश पागी भगतच्या गावातील असल्याने दोघांचेही घनिष्ठ संबंध आहेत, असे चौकशीअंती उघड झाले आहे. अलिकडेच कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षा रक्षकाला अमली पदार्थ प्रकरणी अटक झाली होती. दर पंधरा दिवसांनी असे प्रकार येथे घडतात. कारागृहात आतमध्ये जाताना तीन गेटवर तपासणी होते. असे असताना  अमली पदार्थाचा व्यवहार कसा होतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी वर्ग व कैदी यांचे साटेलोटे असल्याने अमली पदार्थ सहजपणे आत जातो असे  चौकशीअंती समजले आहे.

Related Stories

जयपूरातील बुद्धिबळ स्पर्धेत वाझ बंधूंची सफल कामगिरी

Patil_p

बाजारपेठा सजल्या, ग्राहकांची उसळली गर्दी

Amit Kulkarni

सत्तरीत वादळी वाऱयाचा वीज खात्याला फटका

Amit Kulkarni

पेडणे मामलेदार कार्यालयाच्या इलेक्ट्रिक पॅनलला आग

Amit Kulkarni

आंदोलकांवर खुनाची कलमे लावण्याचा प्रयत्न दुर्दैवी

Patil_p

जि.पंचायतीतील यश हे भाजपवरील विश्वासाचे प्रतिक

Patil_p
error: Content is protected !!